Morning Exercise Tips: सकाळी व्यायाम करुन परतल्यावर 'या' 3 गोष्टी करणे गरजेचेच

Morning Exercise Tips: थकलेल्या शरीराला थोडी विश्रांती मिळू शकते.
Morning Exercise Tips:
Morning Exercise Tips:Dainik Gomantak
Published on
Updated on

Things To Do After Morning Exercise: आपल्या बदलत्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

त्यासाठी आपण विविध प्रकारच्या व्यायामाचा अवलंब करत असतो.

या व्यायामामध्ये योगासने, जीम ,चालणे , धावणे, सायकलिंग अशा अनेक व्यायामप्रकारांचा समावेश होतो.

मात्र चालून किंवा धावून आल्यानंतर काही गोष्टींचा काळजी घेणे महत्वाचे असते. नाहीतर आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

आज आपण जाणून घेणार आहोत त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही व्यायाम केल्याच्या एका तासाभरात केल्याच पाहिजेत.

1. शरीर थंड करा

व्यायाम करताना आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे फिरून परतल्यावर गरम वाटतं. म्हणूनच व्यायाम करुन परल्यावर आपण आपले शरीर थंड केले पाहिजे.

यासाठी घरी परतल्यानंतर काही वेळ शांत बसा. जेणेकरून तुमच्या हृदयाचे ठोके सामान्य होऊ शकतात आणि थकलेल्या शरीराला थोडी विश्रांती मिळू शकते.

2. प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा

सकाळी चालताना जे फायदे मिळतात, त्याचप्रमाणे व्यायामामुळे शरीरात पाण्याची कमतरता असल्याने उर्जेची कमतरता देखील जाणवते.

म्हणूनच व्यायाम करुन परतल्यानंतर पाणी प्यायल्यावर प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा.

जेणेकरून तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल. प्रोटीन शेक किंवा केळी सारखे पदार्थ तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरतील.

यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतील. यासोबतच शरीराला भरपूर जीवनसत्त्वेही मिळतील.

Morning Exercise Tips:
Poha Health Benefits: पोहे फक्त तुमच्या जिभेची चवच पुरवत नाहीत तर शरीराला देतात 'हे' फायदेही; सविस्तर वाचा

3. भरपूर पाणी प्या

व्यायाम करुन परत आल्यावर पुढच्या तासभरात भरपूर पाणी प्या. सकाळी चालताना किंवा इतर व्यायाम करताना आपले शरीर खूप थकते ज्यामुळे शरीरातील पाणी संपते.

त्यामुळे व्यायाम करुन परतल्यावर पाणी प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होईल. तुम्ही काही इलेक्ट्रोलाइट पेये घेऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com