omicron symptoms

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

ओमिक्रॉनची 'ही' 2 लक्षणे, दिसताच काळजी घ्या

डब्ल्यूएचओच्या मते, ओमिक्रॉन कोरोना पेक्षा तिप्पट संसर्गजन्य आहे आणि अधिकाधिक लोकांना संक्रमित करू शकतो

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीच्या लाटेत सर्दी-खोकला आणि ताप ही सामान्य लक्षणे होती. थंडीच्या मोसमातही बहुतेकांना हा त्रास होतो. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये त्याची लक्षणे ओळखणे देखील महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनची दोन लक्षणे सामान्य सर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. त्यांची माहिती करून घेतल्यास या नवीन व्हायरसचा संसर्ग वेळीच टाळता येऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, त्याची लक्षणे कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भिन्न लक्षणे असणे सामान्य आहे. ओमिक्रॉनच्या बाबतीतही असेच आहे. ओमिक्रॉनची लक्षणे सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात, परंतु डोकेदुखी आणि थकवा या दोन लक्षणांनी हळूहळू सुरुवात होते.

ओमिक्रॉनची सामान्य लक्षणे - डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, ओमिक्रॉन कोरोना पेक्षा तिप्पट संसर्गजन्य आहे आणि अधिकाधिक लोकांना संक्रमित करू शकतो.

आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनची (omicron variant) लक्षणे डेल्टासारखी गंभीर नाहीत. ओमिक्रॉनच्या काही सामान्य लक्षणांमध्ये सौम्य तापाचा समावेश होतो, जो स्वतःच निघून जातो. याशिवाय थकवा, घशात खवखवणे आणि शरीरात तीव्र वेदना ही ओमिक्रॉनची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. ओमिक्रॉनमध्ये तोंडाला चव नसणे आणि वास न समजणे अशी लक्षणे दिसून येत नाहीत.

ओमिक्रॉन आणि डेल्टा -

आरोग्य तज्ञ अजूनही ओमिक्रॉन आणि डेल्टाची लक्षणे पूर्णपणे ओळखू शकले नाहीत. आत्तापर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की केवळ 50 टक्के लोकांना कोरोना विषाणूची तीन लक्षणे दिसतात. ताप, खोकला किंवा चव कमी होणे. याशिवाय सर्दी, डोकेदुखी, सौम्य किंवा जास्त थकवा, शिंका येणे किंवा घसा खवखवणे या दोन्ही प्रकारांमध्ये जाणवते.

ओमिक्रॉनपासून संरक्षण कसे करावे -

कोरोनाचा (Corona) संसर्ग टाळण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे फार महत्वाचे आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये स्वतःला गर्दीपासून दूर ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करा. मास्क व्यवस्थित लावा आणि आवश्यक असल्याशिवाय तो अजिबात काढू नका. आपले हात वेळोवेळी स्वच्छ ठेवा आणि काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT