प्रियोळ येथील ‘मिस्टिक वुड्स’ बनले पर्यटकांचे आकर्षण  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

प्रियोळ येथील ‘मिस्टिक वुड्स’ बनले पर्यटकांचे आकर्षण

प्रियोळ गावात असलेला ‘मिस्टिक वुड्स’ (Mystic Woods) हा, पर्यावरण संवर्धनाशी संबंधित असलेला प्रकल्प (Project) आज अनेकांच्या आकर्षणाचा विषय झालेला आहे.

दैनिक गोमन्तक

प्रियोळ गावात असलेला ‘मिस्टिक वुड्स’ (Mystic Woods) हा, पर्यावरण संवर्धनाशी संबंधित असलेला प्रकल्प (Project) आज अनेकांच्या आकर्षणाचा विषय झालेला आहे. एका उजाड जमिनीचे रूपांतर हिरव्यागार क्षेत्रात करण्यात ज्योती आणि यशोधन हेबळेकर या जोडप्याने दाखवलेल्या कौशल्याची ती कमाल आहे. या साऱ्या प्रक्रियेत फुलपाखरांना मध्यस्थ बनवण्यात त्यांचे खरे चातुर्य होते.

फुलपाखरे परागकण वाहून नेत नाहीत. ते काम मधमाशा करतात. मात्र उजाड जागेवर वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतींच्या वाढीस फुलपाखरे एक प्रकारे अटकाव करतात. अशा तऱ्हेने त्या वनस्पतींच्या वाढीला अटकाव होऊन त्या जागेत इतर झाडे (Trees) उगवण्यात मदत होते. यशोधनच्या मते जंगलवाढीच्या कामगिरीत फुलपाखरांचे सहाय्य नोंद करण्यासारखे असते. फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी हेबळेकर दाम्पत्याने आपल्या या जागेत मात्र केल्या. फुलपाखरांच्या प्रजननासाठी फुलपाखरांना स्थानिक वनस्पती, स्वच्छ हवा (Fresh Air) आणि बुरशीयुक्त मातीची आवश्यकता असते.

ज्योती आणि यशोधन यांनी परिवर्तित केलेल्या या देखण्या जागेत फुलपाखरे साधारण सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान पाहायला मिळतात. पण या जागेला भेट देणारे पर्यटक (Tourist) मुद्दाम इथे येतात ते या जोडप्याची पर्यावरणविषयक (Environment) दृष्टी समजून घेण्यासाठी. त्यांच्या त्या छोट्याशा जागेत, ‘मिस्टिक वूडस’मध्ये फुलपाखरावरची, त्यांच्या जगण्यात सहाय्यकारी होणाऱ्या वनस्पतींची, गोव्याच्या (Goa) मसाल्याच्या पुरातत्त्वीय प्रवासाची आणि जीवाश्मांची माहिती देणारा हा छान असा उपक्रम सुरू आहे. छोटेखानी टेकडीसदृश असलेले हे देखणे स्थळ आहे.

या जागेला लागून असलेले ज्योती आणि यशोधन यांचे घरदेखील तिथल्या आकर्षणाचा विषय आहे. ज्यावेळी त्या दोघांचे घर बांधायचे ठरले तेव्हा, ते पर्यावरणपूरक (Environment) असेच बांधावे हे निश्चित होते. पावसाळ्यात (Rainy Day )पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा न होऊ देता ते पाणी पुन्हा कसे वापरता येईल याचा विचार घर बांधताना प्रथम झाला आणि त्यानंतर घर आकार घेताना ते झाडावेलींना आपल्या अंगावर कसे वागवेल हे पाहिले गेले. त्यांच्या या घराची रचना अद्भुत अशीच आहे. हे घर बांधताना त्याबद्दल निर्माण झालेल्या अनेक शंकांवर विजय मिळवून अजूनही हे त्यांचे घर आपले देखणेपण मिरवते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Jatra 2026: श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाची तारीख जाहीर, म्हापशात कार्यक्रमांची रेलचेल; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Vasco: वास्कोत ‘सीसीटीव्ही’ बनले शोभेची वस्तू! गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नादुरुस्त कॅमेरे चर्चेत; कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित

Goa Live News: जागृत पर्यावरण प्रेमींसोबत; आमदार आरोलकर यांनी दिली ग्वाही

अग्रलेख: अनागोंदी कारभार पाहणाऱ्या, शिव्या ऐकणाऱ्या सामान्य गोंयकाराच्या तोंडी एकच प्रश्‍न आहे, ‘कुठे नेऊन ठेवणार गोवा?’

Goa Politics: 'जी गोष्ट भाजपची तीच विरोधकांची'! झेडपी निवडणूक निकालानंतरच्या राजकीय घडामोडी

SCROLL FOR NEXT