Mobile Addiction And Myopia Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Myopia Disease: सावधान! तासन्तास रील्स पाहण्याचा नाद ठरतोय जीवघेणा; मुलांसह तरुण ठरतायेत 'मायोपिया'चे शिकार

Mobile Addiction And Myopia: मोबाईल हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र मोबाईल आणि रील्सच्या अति मोहामुळे डोळ्यांवर विपरित परिणाम होत आहे.

Manish Jadhav

myopia disease causes symptoms and prevention tips

मोबाईल हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र मोबाईल आणि रील्सच्या अति मोहामुळे डोळ्यांवर विपरित परिणाम होत आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, येत्या 10 वर्षांत देशातील निम्म्याहून अधिक मुले मायोपिया आजाराने ग्रस्त असतील. मुलांमध्ये ज्या पद्धतीने रील कल्चर वाढत आहे, त्याचा त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे दृष्टी हळूहळू कमी होत असल्याचे डॉ. समीर सूद यांनी सांगितले. देशातील प्रत्येक शहरी आणि ग्रामीण भागात ही समस्या वाढत आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातही मुलांमध्ये (Children) स्क्रीन टाइम लक्षणीयरीत्या वाढला आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळेच मुले मायोपियाचे बळी ठरत आहेत. डॉ. सूद यांनी सांगितले की, सर्वात धोकादायक बाब म्हणजे जेव्हा या आजाराची लक्षणे आढळतात तेव्हा डोळ्यांची स्थिती खूपच वाईट झालेली असते.

सोशल मीडियाचा वाढता वापर

डॉ. समीर सूद यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या वाढत्या आजारामागे सर्वात मुख्य कारण सोशल मीडिया (Social Media) आहे. मुले तासन्तास रील पाहतात. रील पाहताना मुलांना वेळ कसा जातोय हेही कळत नाही. जास्त वेळ रील पाहिल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. रात्रीच्या वेळी लाईट बंद केल्यानंतर मुले मोबाईल फोन पाहतात तेव्हा ही परिस्थिती आणखी हानिकारक बनते. याचा अधिक वाईट परिणाम होतो.

डोळे कोरडे पडणे

डॉ. सूद यांनी पुढे सांगितले की, या समस्येचे प्रमुख कारण म्हणजे डोळे कोरडे पडणे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स पाहण्यामुळे सर्व वयोगटातील, विशेषतः मुले आणि तरुणांमध्ये डोळ्यांशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. मुलांमध्ये कोरड्या डोळ्यांचा सिंड्रोम, मायोपियाची प्रोग्रेस, डोळ्यांवर ताण आणि अगदी सुरुवातीलाच डोळे मिचकावणे ही प्रकरणे अधिक दिसून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT