
Breast Cancer Awareness Mammography Test For Women
महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहे. जागरुकतेच्या अभावामुळे दरवर्षी हजारो महिला या गंभीर आणि प्राणघातक आजाराला बळी पडत आहेत. मात्र, जर वेळेवर उपचार मिळाले तर हा आजार टाळता येऊ शकतो. अशा परिस्थितीत, स्तनाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान होणे गरजेचे ठरते. यासाठी एक चाचणी आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असोत किंवा नसोत, प्रत्येक महिलेने वयाच्या 30व्या वर्षानंतर एकदा तरी ही चाचणी केली पाहिजे.
दरम्यान, स्तनाच्या कर्करोगासाठी अनेक चाचण्या असल्या तरी सर्वात महत्वाची आणि पहिली चाचणी म्हणजे 'मॅमोग्राफी'. ही चाचणी स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहिती देते. यामध्ये, एक्स-रेच्या मदतीने स्तनात गाठ आहे का ते तपासले जाते. स्तनात गाठ किंवा कोणताही असामान्य बदल आढळल्यास ताबडतोब ऑन्कोलॉजी डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधावा. जर तुमचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असेल तर दरवर्षी एकदा चाचणी करावी. साधारणपणे या चाचणीचा खर्च 1000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान आहे. ही चाचणी सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये करता येते. ही चाचणी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत आहे. ही चाचणी देशातील प्रत्येक मोठ्या सरकारी रुग्णालयात केली जाते. मॅमोग्राम व्यतिरिक्त, महिला इतर काही चाचण्या करु शकतात.
जर स्तन घन (डेंस) असेल तर डॉक्टर मॅमोग्राफीसोबत अल्ट्रासाऊंड चाचणी करण्याचा सल्ला देतात. यामध्ये, स्तनाच्या टिशूजना स्कॅन केले जाते. जेव्हा मॅमोग्राफीमध्ये काही शंका येते किंवा 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना (Women) गाठ जाणवते तेव्हा डॉक्टर अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला देतात. या चाचणीसाठी खर्च 800-2,000 रुपयांदरम्यान येतो.
एमआरआय ही एक हाय-रिझोल्यूशन चाचणी आहे, जी कर्करोगाचे लवकर निदान करण्यास मदत करु शकते. मॅमोग्राफी आणि अल्ट्रासाऊंडमध्ये शंका आल्यानंतर, डॉक्टर एमआरआय करायला सांगतात. हाय रिस्क असलेल्या महिलांसाठी ही चाचणी अधिक प्रभावी ठरते. यामुळे कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यातील रुग्णाला स्तनाचा कर्करोग आहे की नाही हे शोधण्यास मदत होते. या चाचणीसाठी खर्च 6,000 ते 15,000 रुपयांदरम्यान येतो.
कर्करोगाची पुष्टी करण्यासाठी जेव्हा गाठीची तपासणी करावी लागते तेव्हा बायोप्सी केली जाते. शरीराच्या त्या भागाला संसर्ग होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर बायोप्सी करतात. यामुळे कर्करोगाचे निदान निश्चित होते. यामध्ये, सुईद्वारे टिशू काढून प्रयोगशाळेत तपासले जातात. या चाचणीसाठी खर्च 5,000 ते 15,000 रुपयांदरम्यान येतो.
जर तुम्हाला गाठ, वेदना, स्तनाग्रातून स्त्राव किंवा स्तनात कोणताही असामान्य बदल दिसला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांना त्याबद्दल कळवा.
जर कुटुंबातील एखाद्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर वयाच्या 30व्या वर्षानंतर नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
वयाच्या 40व्या वर्षानंतर, प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा मॅमोग्राफी करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.