Morning Walk Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Morning Walk: नियमितपणे 30 मिनिटं मॉर्निंग वॉक केल्याने होतील 'हे' 5 फायदे

शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी चालणे फार गरजेचे आहे.

Puja Bonkile

Benefits of Morning Walk: निरोगी आरोग्यासाठी सकाळी चालणे खुप फायदेशीर असते. सकाळ चालण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीरासोबतच मनही निरोगी राहते.

तसेच यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासूनही आराम मिळतो. पण तुम्ही जर नियमितपणे चालत असाल तरच याचा फायदा होतो.

शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने खाणे आवश्यक आहे, त्याच पद्धतीने व्यायाम आणि चालणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यायाम करता येत नसेल तर सकाळी 30 मिनिटे चालण्याचा नित्यक्रम करा. फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.

  • सकाळी चालण्याचे हे आहेत फायदे

हृदयविकार

जर तुम्ही योगा किंवा जीमला जात नसाल पण सकाळी चालत असाल तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

उच्च रक्तदाब

फक्त 30 मिनिटांच्या चालण्याने तुम्ही तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकता. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना दररोज चालणे गरजेचे आहे.

वजन नियंत्रणात राहते

सध्याची जीवनशैली पाहता लोकांचे वजन वाढत आहे. त्यामुळे असे लोक चिंतेत असतात. अशा परिस्थितीत दररोज 30 मिनिटे चालल्यास तुम्ही तुमचे वाढते वजन नियंत्रित ठेउ शकता. एवढेच नाही तर चालण्याने कॅलरीजही बर्न होतात.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी किमान 30 मिनिटे मोकळ्या जागेत चालणे गेरजेचे आहे. यामुळे त्यांना खूप आराम मिळेल आणि जर तुम्ही योग्य आहार घेऊन चालत असाल तर तुम्हाला त्याचा फायदाही मिळेल.

सांधेदुखी

अनेक वेळा वृद्धांना सांधेदुखीची समस्या असते. अशा स्थितीत त्यांनी दररोज 30 मिनिटे चालणे गरजेचे आहे. यामुळे त्यांचे स्नायू मजबूत राहतील आणि सांधेदुखीतही आराम मिळेल.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT