Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट व्हेजिटेबल उत्तपा!

व्हेजिटेबल उत्तपा हा सकाळच्या नाश्त्यासाठी आरोग्यदायी डिश आहे.
Morning Breakfast Recipe
Morning Breakfast RecipeDainik Gomantak

Morning Breakfast Vegetable Uttapam Recipe: सकाळचा नाश्ता करणे खुप फायदेशीर असते. सकाळचा नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटते. नाश्त्याशी तडजोड करणे चुकीचे आहे.

नाश्ता असा असावा की तो फक्त टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असेल. अनेकदा नाश्ता सर्वात घाईत तयार केला जातो. कारण हीच वेळ असते जेव्हा मुले शाळेत जातात आणि बाकीचे कामावर जातात.

सकाळच्या नाश्त्यात काय करावे हे समजत नाही. तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल, तर व्हेजिटेबल उत्तपा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा पदार्थ चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

  • व्हेजिटेबल उत्तपा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

धुतलेली उडदाची डाळ - 1/2 कप

तांदूळ - 1 कप

आले पेस्ट - 1 टीस्पून

कढीपत्ता - 1 वाटी

बारीक चिरलेली गाजर - 1 कप

बारीक चिरलेला कांदा - 1कप

बारीक चिरलेला टोमॅटो - 1 कप

बारीक चिरलेली सिमला मिरची - 1 कप

मटार - 1 कप

तेल - 4 टेस्पून

हिंग - 1/2 टीस्पून

मीठ - चवीनुसार

Morning Breakfast Recipe
Tips For Visiting Goa in Monsoon: पावसाळ्यात गोव्याला फिरायला जाताना 'या' गोष्टी टाळा
  • व्हेजिटेबल उत्तपा बनवण्याची कृती

व्हेजिटेबल उत्तपा बनवण्यासाठी सर्वात पहिले एक दिवस आधी तांदूळ-डाळ पाण्यात भिजत ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी त्याचे पाणी गाळून घ्यायावे.

मिक्सरच्या मदतीने बारिक करावे. या मिश्रणात यीस्ट उठल्यावर त्यात आले पेस्ट, कढीपत्ता, हिरव्या भाज्या, मीठ आणि हिंग घालून त्याचे मिश्रण तयार करा. यानंतर नॉनस्टिक पॅन घ्यावा.

मध्यम आचेवर ठेवावे. तवा गरम झाल्यावर त्यात थोडे तेल टाकावे. लक्षात ठेवा की हे तेल सर्व तव्यावर पसरवायचे आहे. यानंतर, लहान लाडूच्या मदतीने आधीच तयार केलेले मिश्रण तव्यावर ठेवा आणि पसरवा.

आता त्याच्या कडांना थोडे तेल लावा, पलटी करा आणि थोडा वेळ शिजू द्यावे. त्याच्या कडांवर हलका तपकिरी रंग आला की दुसऱ्या बाजूने फिरवा. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजल्यानंतर काढावे. घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा मुलांना तुम्ही हिरव्या चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com