अनेकांना सकाळी नाश्ता (BreakFast) करायची सवय असते. पण सकाळी कोणता हेल्दी (Healthy) नाश्ता करावा हे अनेकांना काळात नाही. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे स्वादिष्ट असून आपल्या आरोग्यासाठी पोषक ठरतील.
* भाजलेले चणे
चणे खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. भाजलेले चणे अनेकांना प्रिय असते. यामुळे पोट सुद्धा लवकर भरते. तुम्ही हे थोडे मीठा सोबत भाजू शकता किंवा काळी मिरी, चाट मसाला आणि इतर कोरडे मसाले घालून ते खाऊ शकता.
* मुरमुरा भेळ
मुरमुऱ्यांमध्ये कॅलरीज कमी असते. पण फायबर आणि प्रथिने अधिक प्रमाणात असतात. मुरमुऱ्यांची भेळ खायला चवदार असते. ही भेळ तुम्ही सकाळच्या नाश्तामध्ये खाऊ शकता. यात तुम्ही कांदा, टोमॅटो, मिरची आणि लिंबू इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकता.
* मिक्स चाट
मिक्स चाट हा सर्वोत्तम भारतीय नाश्ता आहे. तुम्हाला यात कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर आणि मसाले टाकून तयार करू शकता. चाट अधिक चवदार होण्यासाठी तुम्ही त्यात घरी बादनवलेले चटणी देखील टाकू शकता. स्वादिष्ट आणि सकस नाश्ता तयार आहे.
* मासाला कॉर्न
मसाला कॉर्न तयार करणे खूप सोपे आहे. हा एक स्वादिष्ट आणि सकस नाश्ता आहे. कॉर्नमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात. यासाठी कॉर्न उकडून घ्यावे. नंतर त्यात मिरची पावडर, मीठ, चाट मसाला टाकून तुम्ही खाऊ शकता. यात तुम्ही पनीर सुद्धा टाकू शकता.
* भाजलेले शेंगदाणे
शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. यात मुबलक प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शेंगडण्याचे सेवन केल्याने ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते. सकाळच्या नाश्तात भाजलेले शेंगदाणे हा एक उत्तम नाश्ता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.