Morning Breakfast: ब्रेड आणि दहीसह बनवा झटपट उपमा
Morning Breakfast: ब्रेड आणि दहीसह बनवा झटपट उपमा Dainik Gomantak

Morning Breakfast: ब्रेड आणि दहीसह बनवा झटपट उपमा

पण आज रवा नाही तर ब्रेड आणि दहीसह उपमा तयार करणार आहोत.
Published on

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे उपमा. उपमा आरोग्यादायी सुद्धा असतो. पण आज रवा नाही तर ब्रेड आणि दहीसह उपमा तयार करणार आहोत. चला तर मग जाणून घेवूया दही आणि ब्रेड उपमा कसा बनवायचा.

* साहित्य

  • दही

  • ब्रेड

  • शेंगदाणे

  • गरम मसाला

  • लिंबू

Morning Breakfast: ब्रेड आणि दहीसह बनवा झटपट उपमा
Health Tips: झोपेची समस्या आहे; मग हे उपाय करून बघा

* कृती

  • उपमा तयार करण्यापूर्वी दही चांगले फेटून घ्यावे.

  • ब्रेडला चांगले बारीक करून घ्यावे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ब्रेड बारीक करू शकता.

  • नंतर कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आले आणि कांदे घालावे.

  • तुम्हाला शेगदाणे आवडत असतील तर आधी भाजून घ्यावे. नंतरच शेंगदाणे घालावे.

  • नंतर हळद घालावी आणि तळून घ्यावे. यात आधीच मीठ आणि गरम मसाला टाकल्यास दही फुटण्याची शक्यता असते.

  • नंतर बारीक केलेली ब्रेड 20 सेकंद टाळून घ्यावी.

  • नंतर यात थोडी साखर आणि गरम मसाला घालावे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात डाळिंब आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकता.

  • तयार आहे स्वादिष्ट उपमा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com