Rava Appe Recipe
Rava Appe Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rava Appe Recipe: नाश्त्यात आस्वाद घ्या रवा आप्पे, होतात झटपट तयार!

दैनिक गोमन्तक

Breakfast Recipe: दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या शौकीन लोकांनी आप्पे चाखलेच असतील. इडली-डोशाप्रमाणेच अप्पेही आवडणाऱ्यांची यादी मोठी आहे. पारंपारिक आप्पे तर अनेकांना आवडतातच पण रव्यापासून बनवलेले आप्पे देखील मोठ्या आवडिने खाल्ले जातात

हे सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून सर्व्ह केले जाऊ शकते.रवा आप्पे बनवण्यासाठी रव्यासोबत भाजीचाही वापर केला जातो.

ज्यामुळे हा पदार्थ चवदार आणि आरोग्यदायी बनतो. जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याने करायची असेल, तर रवा आप्पे नक्की ट्राय करुन पाहा.

  • रवा अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा - 1/2 किलो

दही - अर्धी वाटी

आले पेस्ट - 1 टीस्पून

लसूण पेस्ट - टीस्पून

हिरवी मिरची चिरलेली - 3/4

कांदा - 1

मोहरी - 1 टीस्पून

हळद - 1/2 टीस्पून

जिरे - 1 टीस्पून

सिमला मिरची - 1

गाजर - 2 (पर्यायी)

टोमॅटो - 1

तीळ - 1 टीस्पून

गरम मसाला - 1/2 टीस्पून

कोथिंबीर - 1 टीस्पून

तेल - 2 चमचे

मीठ - चवीनुसार

रवा आप्पे बनवण्याची पध्दत

रवा आप्पे बनवण्यासाठी प्रथम रवा स्वच्छ करून एका मोठ्या भांड्यात ठेवा. आता बाऊलमध्ये दही घाला आणि दही रवा बरोबर मिक्स करा.

आता या मिश्रणात सुमारे 2 कप पाणी घालून चांगले फेटा आणि घट्ट पेस्ट तयार करा. तयार पेस्ट झाकून 15 मिनिटे बाजूला ठेवा. आता गाजर, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची यांचे बारीक तुकडे करा.

आता कढईत 2 चमचे तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे टाकून ते तडतडत नाही तोपर्यंत तळून घ्या.

यानंतर कढईत आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट घाला आणि तळून घ्या. नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून बारीक चिरलेला कांदा घाला. आता कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.

यानंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची आणि चिरलेली गडर घाला आणि ढवळत असताना शिजवा. थोड्या वेळाने चिरलेला टोमॅटो घालून सर्व साहित्य मऊ होईपर्यंत तळून घ्यावे.

गॅस वाढवा आणि भाज्या 2 मिनिटे शिजवा. भाज्या मऊ झाल्यावर त्यात हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ एकत्र करून आणखी 1 मिनिट शिजवा. नंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.

भाज्यांचे मिश्रण थंड झाल्यावर रव्याच्या पिठात घालून चांगले मिक्स करावे. आता थोडे जिरे, चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. आता आप्पे बनवण्यासाठी एक भांडे घ्या आणि त्यात थोडे तेल आणि मोहरी टाका.

यानंतर सर्व खणांमध्ये आप्पेचे पीठ भरून भांडे बंद करून 2-3 मिनिटे शिजवा. नंतर झाकण उघडा, अप्पे उलटा आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा 2-3 मिनिटे शिजवा. नाश्त्यात त्यांना चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

SCROLL FOR NEXT