Drumstick Benefits For Men: पुरुषांसाठी वरदान आहे शेवग्याची शेंग, जाणून घ्या फायदे

शेवग्याची शेंग पुरुषांसाठी का फायदेशीर ठरते वाचा एका क्लिकवर
Drumstick Benefits For Men
Drumstick Benefits For MenDainik Gomantak

Benefits of Eating Drumstick For Men: आपल्या शरीरासाठी शेवग्याच्या शेंगा खूप फायदेशीर असता हे तुम्हाला माहिती असेलच. पण याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो.

कारण ही भाजी जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक तत्वांनी युक्त असते. या शेंगांची भाजी अनेकजण बनवून खातात. या भाजीला औषध तसेच वैद्यक शास्त्रात खूप महत्व आहे.

या शेंगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते वाढण्‍यासाठी फार कमी पाणी लागते. विशेष म्हणजे ही भाजी पुरुषांसाठीही खूप फायदेशीर असते. शेवगा पुरुषांमध्ये प्रोस्टेट आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि कामवासना सुधारण्यासाठी आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

  • पुरुषांसाठी फायदेशीर

अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार, शेवगा पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगली आहे. 

शेवग्यामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी, लैंगिक पौरुषता आणि पुरुषांची कामवासना वाढवण्याची क्षमता असते. आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या फुलांना खूप महत्त्व आहे. कारण ते पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या आणि प्रजनन क्षमता सुधारते. 

Drumstick Benefits For Men
H3N2 Virus: गर्भवती महिलांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास, वेळीच सावध व्हा
  • गरोदर महिलांसाठी फायदेशीर 

अनेक तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिलांसाठी (Women) शेवग्याची पाने खूप फायदेशीर असतात. आपले वडील प्राचीन काळापासून गर्भवती महिलांना तुपासह गरमागरम याची पाने देत असे. याचा वापर केल्याने गर्भवती महिलांमध्ये दुधाची कमतरता होत नसे. यासोबतच त्यांचे मूलही निरोगी राहते. या पानांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. 

  • हृदयासाठी फायदेशीर

ही भाजी आपल्या हृदयासाठी (Heart) खूप फायदेशीर आहे. कारण ती कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. हृदयाच्या स्‍वास्‍थ्‍यासाठी ड्रमस्टिक खूप फायदेशीर ठरू शकते. 

शेवगामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता देखील असते. विशेष म्हणजे साखरेची पातळी कमी केल्याने हृदयाला खूप फायदा होतो. हृदय निरोगी असेल तर आरोग्य चांगले राहिल.

  • पोटाशी संबंधित आजार दुर होतात

पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या असेल तर या शेगांचे सेवन करावे. या झाडाच्या फुलाचा किंवा भाज्यांच्या रसाचा खूप चांगला असतो. त्यामुळे उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या उद्भवू नयेत म्हणून या भाजीच्या रसाचे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com