Morning Breakfast| paneer Tiika  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast: पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यात बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का

पावासाळ्यात सकाळच्या नाश्त्यात तुम्ही पनीर टिक्काचा आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

Paneer Tikka Recipe: तुम्ही अनेक वेळा हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून पनीर टिक्काचा आस्वाद घेतला आहे. पनीर टिक्का अनेक लोकांना आवडतो. ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुम्ही पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यात बनवू शकता.

पण तुम्हाला रेस्टॉरंटसारखा पनीर टिक्का घरी बनवता येत नसेल, तर पुढिल रेसिपी वाचून करू शकता. पनीर टिक्का ही अशी डिश आहे की जी लहान मुलांपासून मोठ्यानाही आवडते. जाणून घेऊया पनीर टिक्का बनवण्याची सोपी पध्दत कोणाती आहे.

  • पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर - 1 पाव

चिरलेला कांदा - 1कप

चिरलेली सिमला मिरची -1 कप

आले-लसूण पेस्ट - 1 टीस्पून

दही - 1 वाटी

भाजलेले बेसन - 2 चमचे

बटर - 1 टेस्पून

साखर - 1/4 टीस्पून

हळद - 1 टीस्पून

जिरे पावडर - 1 टीस्पून

काळी मिरी पावडर - 1/4 टीस्पून

गरम मसाला - 1/2 टीस्पून

धने पावडर - 1 टीस्पून

लिंबाचा रस - 1 टीस्पून

कसुरी मेथी 1/4 टीस्पून

मोहरी तेल - 2 टेस्पून

मीठ - चवीनुसार

  • कृती

पहिले पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करून घ्यावे. नंतर सिमला मिरची आणि कांदा मोठ्या चौकोनी तुकडे करून घ्यावे. आता एका भांड्यात दही ठेवा आणि दही गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्यावे. दही एकदम गुळगुळीत झाल्यावर त्यात भाजलेले बेसन, काश्मिरी लाल तिखट, जिरेपूड, धने पावडर आणि इतर सर्व मसाल आणि साखर आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे.

आता एका छोट्या कढईत मोहरीचे तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हळद घालून मिक्स करा. आता दह्याच्या मिश्रणात गरम तेल घालून चांगले मिक्स करावे. यानंतर या मिश्रणात पनीर, कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे टाकून चांगले मिक्स करावे. यानंतर भांडे झाकून ठेवा आणि 4 तास मॅरीनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

नंतर पनीर सोनेरी होईपर्यंत डिप फ्राय करून घ्यावे. आता टिक्का एका प्लेटमध्ये ठेवा आणि वर चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला आणि हिरव्या चटणीसह गरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT