Women Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women Health: महिलांनो हृदय जपा... मेनोपॉजनंतर हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश

Women Health: महिलांना वाढत्या वयाबरोबर अनेक आजारांनी घेरले जाते. विशेषतः मेनोपॉज (मासिक पाळी येणं बंद होणं) नंतर आजार वाढू लागतात.

Manish Jadhav

Women Health: वाढत्या वयाबरोबर महिलांना अनेक आजारांनी घेरले जाते. विशेषतः मेनोपॉज (मासिक पाळी येणं बंद होणं) नंतर आजार वाढू लागतात. मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हृदयरोगाचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. तज्ज्ञांचे मते, बहुतेक महिलांना मेनोपॉजनंतरच हृदयविकाराचा झटका येतो. द लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, 45 वर्षानंतर महिलांमध्ये पूर्वीपेक्षा हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. विशेष म्हणजे त्याचा थेट संबंध मेनोपॉजशी आहे.

मेनोपॉज नैसर्गिक प्रक्रिया

मेनोपॉज ही महिलांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा महिलांना मासिक पाळी येणे बंद होते तेव्हा त्याला 'मेनोपॉज' म्हणतात. यानंतर, महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. हे सहसा 50 वर्षांच्या वयानंतर होते, परंतु काही महिलांमध्ये ते 45 ते 50 च्या दरम्यान देखील होऊ शकते. मेनोपॉजनंतर, महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी होऊ लागते. जेव्हा असे होते तेव्हा अनेक आजारांचा धोका वाढतो.

मेनोपॉज आणि हृदयविकाराचा काय संबंध?

तज्ञांच्या मते, शरीरात इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे रक्तातील कॅपिलरीज हार्ड होऊ लागतात. यामुळे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊ लागतात. इस्ट्रोजेन हार्मोन आर्टरीज फ्लेक्सिबल ठेवत असल्याने ते कमी झाल्यानंतर आर्टरीजची फ्लेक्सिबिलिटी पूर्वीच्या तुलनेत कमी होऊ लागते. या कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय, महिला लठ्ठपणाच्या शिकारही ठरतात. जो हृदयरोगासाठी एक प्रमुख रिस्क फॅक्टर आहे. तसेच, वयाच्या 50 व्या वर्षानंतर महिलांना वाढलेले कोलेस्टेरॉल आणि हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज येण्याची समस्या देखील जाणवू लागते. हे दोन्हीही हृदयविकाराचे कारण ठरु शकतात.

मेनोपॉजनंतर या गोष्टी लक्षात ठेवा

तज्ञांनी सांगितले की, मेनोपॉजनंतर महिलांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांनी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. तसेच, सुका मेवा खाल्ला पाहिजे. पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. याशिवाय मीठ, मैदा आणि साखरेचा वापर कमी करा. धूम्रपान आणि मद्यपान करु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

SCROLL FOR NEXT