Women Health: मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Thyroid: गर्भधारणेदरम्यान महिलांनी खूप काळजी घ्यावी. थोडासा निष्काळजीपणाही आई आणि बाळ दोघांसाठी घातक ठरु शकतो.
Women Health: मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Pregnancy TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Women Health: गर्भधारणेदरम्यान महिलांनी खूप काळजी घ्यावी. थोडासा निष्काळजीपणाही आई आणि बाळ दोघांसाठी घातक ठरु शकतो. गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. थायरॉईड हार्मोन्समध्ये बदल होतो. गर्भधारणेदरम्यान काही महिलांमध्ये थायरॉईड वाढण्याची समस्या वाढू शकते. ज्यामुळे महिलांच्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य माहिती असणे महत्त्वाचे आहे. जन्मानंतर मुलांमध्येही हा आजार दिसून येतो हे अनेक वेळा दिसून आले आहे. गर्भवती महिलांना थायरॉईडचा आजार का होतो आणि तो मुलांपर्यंत कसा पोहोचतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

उलट्या आणि मळमळ

गर्भधारणेदरम्यान, काही महिलांना उलट्या आणि मळमळ होण्याची समस्या सुरु होते, ज्यामुळे एचसीजी हार्मोनची पातळी वाढू लागते. यामुळे शरीरात थायरॉईड हार्मोन देखील वाढते. यामुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या न जन्मलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो.

Women Health: मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Women Health Care: वाढत्या वयानुसार महिलांना वजन कमी करणे कठीण का होते? वाचा सविस्तर

हा आजार मुलांपर्यंत कसा पोहोचतो?

तज्ञांच्या मते, इम्यून डिसऑर्डरमुळे काही महिलांना गर्भधारणेदरम्यान हायपरथायरॉईडीझमची समस्या उद्भवू शकते. यामध्ये, व्यक्तीची इम्यून सिस्टिम थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते. ज्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात थायरॉईड हार्मोनचा स्राव होऊ लागतो. महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम मुलांवरही होतो. अशा परिस्थितीत हा आजार मुलांपर्यंत पोहोचतो. काही महिला गरोदरपणात त्यांच्या आहारात जास्त आयोडीन घेण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे हायपरथायरॉईडीझमची शक्यता वाढते. म्हणून, जास्त आयोडीन घेणे टाळावे.

Women Health: मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Women Health Care: नॉनस्टिक पॅन अन् हेअर डाय सुद्धा कॅन्सरचे कारण, संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

थायरॉईड म्हणजे काय?

थायरॉईड ही आपल्या घशात असलेली एक ग्रंथी आहे. ही ग्रंथी आपल्या शरीरात थायरॉईड हार्मोन तयार करते. थायरॉईड हार्मोन अनेक क्रियांना कंट्रोल करते. यामध्ये हृदयाचे ठोके आणि चयापचय यासारख्या क्रियांचा समावेश आहे. जर शरीरातील थायरॉईड ग्रंथी खूप वाढल्या किंवा कमी थायरॉईड हार्मोन तयार करु लागल्या तर शरीरात थायरॉईडची समस्या वाढू लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com