man spends 11 lakh to fulfill his dream of Living as a dog with ultra realistic costume
man spends 11 lakh to fulfill his dream of Living as a dog with ultra realistic costume Dainik Gomantak
लाइफस्टाइल

11 लाख रुपये खर्च करून माणूस बनला 'कुत्रा', ओळखणे झाले अशक्य

दैनिक गोमन्तक

जपानमधील एक व्यक्ती 11 लाख रुपये खर्च करून कुत्रा बनला आहे.त्याला पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की, हा खरोखर कुत्रा नसून मानव आहे. टोको नावाच्या एका जपानी ट्विटर युजरने त्याचे रूप दाखवून लोकांना आश्चर्यचकित केले. त्या व्यक्तीला लहानपणापासूनच प्राण्यांचे जीवन जगायचे होते आणि त्याला कुत्र्यांवर खूप प्रेम होते असे तो सांगतो. त्यामुळे त्याने आपला लूक बदलण्यासाठी झेपेटच्या स्पेशल इफेक्ट्स वर्कशॉपशी संपर्क साधला आणि स्वत:ला अल्ट्रा रिअॅलिस्टिक कुत्र्याचा पोशाख मिळवून दिला. ते घातल्यानंतर कोणत्याही माणसाला ते समजत नाही.(man spends 11 lakh to fulfill his dream of Living as a dog with ultra realistic costume)

11 लाख खर्च करून बनवला 'कुत्रा'

टोको नावाच्या व्यक्तीची ही विचित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी झेपेटने त्याच्याकडे बरीच रक्कम मागितली. टोकोने त्याला एकूण 2 मिलियन येन म्हणजेच 11 लाख 63 हजार रुपये भारतीय चलनात फी म्हणून दिले. त्याला पूर्णपणे मूळ दिसणारा कुत्र्याचा पोशाख बनवला. टोकोचा हा पोशाख इतका जबरदस्त आहे की तो घातल्यानंतर तो कुठूनही माणूस वाटत नाही. कंपनीचे म्हणणे आहे की हा पोशाख बनवण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. कारण मानव आणि कुत्र्यांमध्ये खूप फरक आहे आणि हा पोशाख घातल्यानंतर त्यांनी कुत्र्यांसारखे दिसावे अशी टोकोची इच्छा होती.

कुत्र्याचा पोशाख कसा बनवायचा

टोकोची क्रेझ पूर्ण करण्यासाठी, वर्कशॉपद्वारे सिंथेटिक फरचा वापर केला गेला आणि अगदी लहान तपशील देखील काळजीपूर्वक तयार केला गेला. तब्बल 40 दिवसांनी हा पोशाख तयार झाला. यानंतर टोकोने ते परिधान केले आणि त्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले.त्याने आपल्या नवीन आयुष्याबद्दल अपडेट्स देण्यासाठी यूट्यूबवर एक चॅनेल देखील तयार केला. तो जपानच्या नॅशनल टीव्हीवरही आला आणि सोशल मीडियावरही त्याच्या या अजब प्रयोगाची चर्चा संपत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT