Palak Paneer Pakoda Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये समोसा,ब्रेड पकोडे खाउन बोर झाले असाल तर आज तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहे. संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही पालक पनीर पकोड्याचा आस्वाद घेउ शकता. तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये ही हटके रेसिपी ट्राय करू शकता. पोषक तत्वांनी युक्त पालक पनीर पकोडे तुमच्यासाठी सर्वोत्तम नाश्ता ठरू शकतात.
पालक पनीर पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पालक
पनीर-100 ग्रॅम
तांदूळ- 2 चमचे
बेसन-4 चमचे
लाल तिखट- 1 चमचे
हळद- 1/4 टीस्पून
ओवा-1 टीस्पून
हिरवी मिरची -2 टीस्पून
बारीक चिरून -1 चमचे
बारीक चिरलेले आले -1 चमचे
कोथिंबीर- 2 चमचे
तेल-2 चमचे
चवीनुसार मीठ
रेसिपी
पालक पनीर पकोडा बनवण्यासाठी सर्वात पहिले पालक बारीक चिरून घ्यावे आणि पनीरही किसून घ्यावे. आता भांड्यात पालक आणि पनीर मिक्स करावे. यानंतर बाऊलमध्ये बेसन, तांदूळ, लाल तिखट, हळद, ओवा, हिरवी मिरची, आले, तेल आणि चवीनुसार मीठ टाका. आता सर्व साहित्य चांगले मिसळा. लक्षात ठेवा की पकोड्याचे पीठ फार पातळ नसावे. यानंतर हाताला तेल लावून पालकाच्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा.
सर्व पकोडे तयार झाल्यावर एअर फ्रायर 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटे गरम करा. आता एअर फ्रायरला तेल लावून सर्व पकोडे एक एक करून एअर फ्रायरमध्ये ठेवा. यानंतर, पकोडे 10मिनिटे शिजवा. पकोडे काढावे. तुमचे कुरकुरीत आणि हेल्दी पालक पनीर पकोडे तयार आहेत. आता टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.