Summer Salad: उन्हाळ्यात रोजच्या सॅलडमध्ये 'या' पदार्थांचा करावा समावेश, वजनही होईल कमी

जेवणासोबत सॅलड खाणे फायदेशीर असते.
Summer Salad
Summer SaladDainik Gomantak
Published on
Updated on

Summer Salad: उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचो आहे. डॉक्टरही अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण पाण्यासोबतच अशा गोष्टींचाही आहारात समावेश करायला हवा, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता जाणानत नाही. 

फक्त हंगामी भाज्या निवडा, घरगुती पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम असते. पोटाचे आजार वाढवणारे भाज्या खाणे बंद करा. भाज्या वापरण्यापूर्वी नीट स्वच्छ धुवावे. रंगीबेरंगी भाज्यांचा आहारात समावेश करावा. 

जेवणासोबत सॅलडचाही समावेश करावा. पण जर तुम्हाला एकाच प्रकारचे सॅलड खाण्याचा कंटाळा आला असेल, तर काही हटके सॅलड रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे वजन कमी होऊन तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

  • काकडीची कोशिंबीर

साहित्य:

काकडी

चिरलेला कांदा

शिमला मिरची

कोबी

गाजर

टोमॅटो

हिरवी मिरची

चवीनुसार मीठ

लिंबाचा रस

  • कृती

सर्व साहित्य एका भांड्यात घेउन चांगले मिक्स करावे. त्यात मीठ आणि लिंबाचा रस घालावा. मीठ घातल्यानंतर हे सॅलड लगेच खावे.

  • क्विनोआ सॅलड

साहित्य: 

शिजवलेला क्विनोआ

चिरलेला टोमॅटो

चिरलेली शिमला मिरची

चिरलेला कांदा

भाजलेल्या भाज्या

चिरलेली काकडी

मीठ

मिरपूड

लिंबाचा रस

  • कृती

एका मोठ्या भाड्यांत सर्व साहित्य एकत्र मिक्स करावे.  हे सॅलड तुम्ही १-२ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण जास्त वेळ बाहेर ठेवू नका.

  • राजमा सॅलेड

साहित्य:

राजमा

कोबी

गाजर

कांदा

सिमला मिरची

लिंबाचा रस

  • कृती

शिजवलेला राजमा किंवा उरलेला राजमा असेल तर तो कापून घ्या आणि कोबी, गाजर, कांदा आणि सिमला मिरची मिक्स करा. त्यात थोडे मीठ आणि लिंबाचा रस घालावा.

Summer Salad
Summer Skin Care: पिठापासून बनवा परफेक्ट फेस पॅक! चेहरा दिसेल ग्लोइंग
  • चणा सॅलेड

साहित्य: 

उकडलेले हरभरे

काकडी

कांदा

गाजर

उकडलेले फ्लॉवर

बीटरूट

मीठ

दही

काळी मिरी पावडर

  • कृती

सर्व गोष्टी एका भांड्यात मिक्स कराव्या. त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि दही घालावे. चणे चांगले उकळुन घ्यावे. अर्धा शिजलेला हरभरा पचण्यास त्रास होईल. 

  • मूग डाळ सॅलेड

साहित्य: 

शिजवलेली मूग डाळ

आवडीच्या चिरलेल्या भाज्या

मीठ

चिंचेचा रस

काळी मिरी पावडर

  • कृती

तुम्हाला तुमची डाळ कशी आवडते यावर अवलंबून आहे. तुम्ही ती पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवू शकता. मूग डाळ पोटासाठी खूप चांगली आहे. डाळ थंड होऊ द्या.

त्यात भाज्या आणि इतर साहित्य घाला. आपण ते एकतर सॅलड किंवा साइड डिश म्हणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि भाज्यांच्या आवडीनुसार सॅलडमध्ये समावेश करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com