broccoli benefits - फूल गोबीसारखीच दिसणारी ब्रोकोली (Broccoli) आरोग्यास (Health) लाभदायी असते. फूलगोबी फक्त दिसायला पांढरी असते, तर ब्रोकोली (Broccoli) गडद हिरव्या , जांभळ्या रंगाचे असतात. ब्रोकोली भजीच्या किंवा सुपच्या स्वरूपात खाता येते. परंतु आपल्याला हवे असल्यास आपण ते उकळून त्यात मीठ टाकून खाऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत ब्रोकोली खूप फायद्याची मानली जाते.
ब्रोकोली (Broccoli) ही प्रामुख्याने इटलीची एक वनस्पती आहे. याचा वापर बहुदा युरोपियन खाद्य, सूप इत्यादीमध्ये जगभर केला जातो. त्याची पाने देखील ब्रोकोलीप्रमाणे फायद्याच्या असतात. याचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा याचे सेवन करू शकतो.
ब्रोकोलीमधील पोषक घटक -
यात प्रोटिन , कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी यासह पॉलिफेनॉल, क्वेरेसेटिन, ग्लूकोसाइड सारखे अनेक पोषक घटक आढळतात. तसेच ब्रोकोलीमध्ये अँटीऑक्सिडंट, एटी - कर्करोग आणि एटी - इंफ्लेमेटरीसारख्या बरेच गुणधर्म आहेत. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. या भाजीत मॅग्नेशियम, लोह, प्रथिने आणि फायबरचा मुबलक प्रमाणात समावेश असतो वाफवलेल्या ब्रोकोलीच्या देठात 4.3 ग्रॅम प्रथिने असते.
ब्रोकोलीचे फायदे-
1) इम्यूनिटी वाढवण्यास मदत -
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकरकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच इतर आजारांचे संसर्ग रोखण्यास मदत करते.
2) गरोदरपनात उपयुक्त -
गर्भावाती महिलांनी नियमित ब्रोकोली खाल्ली पाहिजे. यात असलेले लोह, फोलेट हे घटक बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच आईस अनेक प्रकारच्या संसर्गापासून दूर ठेवता येते .
3) वजन कमी होते -
ब्रोकोलीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रथिने असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
4) नेत्रविकारावर फायदेशीर -
ज्या लोकांना मोतीबिंदुचा आजार आहे, त्यांनी ब्रोकोलीचे सेवन करणे गरजेचे आहे. यात अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
5) हृदयरोगावर उपयुक्त -
ब्रोकोलीमध्ये बरेच पोषक घटक आढळतात. हे रक्तवाहिन्याना निरोगी ठेवयास मदत करते. ब्रोकोलीचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार आणि इतर आजारांचा धोका कमी होतो. ब्रोकोलीमधील पोटॅशियम कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास अटकाव करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.