किडनी स्टोन असेल तर टमाटर खाणे टाळा

टमाटर (Tomatoes) अधिक प्रमाणात खाल्याने शरीरातील कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण वाढते. यामुळे किडनी स्टोन (kidney stone) होण्याचा धोका निर्माण होतो.
 टमाटरचे अनेक फायदे असून त्याचे काही  दुष्परिणाम देखील आहेत .
टमाटरचे अनेक फायदे असून त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत . Dainik Gomanatk
Published on
Updated on

Health Care Tips : टमाटर (Tomatoes) ही एक अशी भाजी आहे, जी इतर भाज्या किंवा सॅलड बनवतांना वापरली जाते. टमाटरचे सूप करून देखील आपण सेवन करू शकतो. घरात जर भाजी नसेल तर टमाटरची झटपट भाजी तयार करता येते. त्याने पोटभर जेवन होऊ शकते. टमाटरचे (Tomatoes) आरोग्यास (Health) अनेक फायदे आहेत. यामुळे स्नायूं बळकट होऊन काही दिवसांनी त्रास कमी होतो. म्हणूनच आपल्या घरातील मोठेलोक याला वेदानाचे शत्रू म्हणतात. याशिवाय त्वचा (Skin) , हृदय (Heart), डोळे (Eyes), आणि वजन कमी (weight loss) करण्यासाठी टमाटर खूप फायद्याचे आहे. परंतु याचे फायदे असून देखील त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत . टमाटर खाणे कोणत्या लोकांनी टाळावे हे आज आपण जाणून घेयूया.

 टमाटरचे अनेक फायदे असून त्याचे काही  दुष्परिणाम देखील आहेत .
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

- किडनी स्टोन असलेल्यांनी टमाटरचे सेवन करणे टाळावे. टमाटरमूळे या लोकांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. यात कॅल्शियम ऑक्सलेटने समृद्ध असतात. टमाटर अधिक प्रमाणात खाल्याने शरीरातील कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण वाढते. यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका निर्माण होतो. तज्ञाच्या मते, 90 टक्के लोकांना किडनी स्टोन असतो. परंतु ज्या लोकांना आधीच किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी टमाटरचे सेवन करणे टाळावे.

 टमाटरचे अनेक फायदे असून त्याचे काही  दुष्परिणाम देखील आहेत .
Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-

- डायरीया हा आजार असल्यास टमाटरचे सेवन करणे टाळावे. यात साल्मोनेला नावाचा बैक्टीरिया असतो. यामुळे डायरीय हा आजार वाढण्यास कारणीभूत ठरतो. सर्वसाधारणपणे निरोगी राहण्यासाठी सर्व पदार्थ मर्यादित परामनात खावे.

- ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्या लोकांनी टमाटर खाणे टाळावे. यात सोलानिन नावाचे एक घटक असते. ज्यामुळे सांधेदुखी किंवा सूज वधू शकते.

 टमाटरचे अनेक फायदे असून त्याचे काही  दुष्परिणाम देखील आहेत .
Health Tips: आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा आणि नैसर्गिकरित्या ऑक्सिजनची पातळी वाढवा

- टमाटरमध्ये मलिक आणि साइट्रिक एसिडचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण करू शकते. यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. गळ्यात जळजळ होणे यासरख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळेच टमाटर मर्यादित सवरूपात खावे.

बरेच वेळ टमाटरचे अधिक सेवन केल्यास अनेकांना त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. चेहऱ्यावर सूज येणे , त्वचेवर दाग येणे, यासरख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण यात हिस्टामिन नावाचा घटक असून यामुळे या समस्या निर्माण होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com