Health Tips - सद्याच्या जग धावपळीचे झाले आहे. त्याउलट स्वत: च्या आरोग्याकडे (Health) लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच पायी चालणे हा एक सोपा आणि उत्तम व्यायाम मनाला जातो. परंतु अनेक लोक चालणे याला व्यायाम (Exercise) मानत नाही. चालल्याने शरीराची हालचाल होते. याचे अनेक फायदे देखील होतात. स्नायू, सांधे आणि हाडे मजुबूत होतात. तसेच शरीराची पचनक्रिया (Digestion) देखील सुरळीत चालते. शरीराला निरोगी (Healthy) आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमितपणे अर्धा तास चालणे (walk) गरजेचे आहे.
- नियमितपणे पायी चालण्याने आपल्या ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते. शरीरातील रक्तवाहिन्यासंबंधित आजारांचा धोका कमी होतो. यासाठी, आठवड्यातून किमान 5 दिवस 30 मिनिटे चालणं गरजेचे आहे. तुम्ही जर ही क्रिया नियमितपने केली तर तुमचे आरोग्य निरोगी राहील.
- फक्त जीम मध्ये जाऊन हेवी वर्कआऊट करून शरीरातील कॅलरी बर्न करू शकता असे नाही. तुम्ही 'अर्धा तास चालणे' ही सोपी पद्धत वापरू शकता. असे केल्याने तुमचे वजन देखील कमी करण्यास मदत मिळू शकते. परंतु तुम्ही किती वेळ आणि किती दिवस चालता यावर देखील अवलंबून असते.
- पायी चालल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील ऑक्सीजनची पातळी वाढते. ज्यामुळे नॉरेपाइनफ्रिन आणि हार्मोन्सची पातळी देखील वाढते.
- पायी चालल्याने शरीरातील मसल्स आणि जॉइंट्स मजबूत होतात. नियमित चालण्याने शरीरातील स्नायूं बळकट होतात. गुडघे आणि कंबरेच्या स्नायूंना बळकट करण्यासह सांधेही मजबूत करण्यासाठी महत्वाचे आहे. सपाट पृष्ठभागावर चालण्या एवजी खंडबळीलत भागात चालणे लाभदायी ठरते.
- नियमितपणे पायी चालण्याने ब्लड शुगरसारख्या आजारांवर नियंत्रणात ठेवता येते. आपल्याला आरोग्य तज्ञ देखील नेहमी चालण्याचा सल्ला देत असतात. तसेच जेवण झाल्यावर न झोपता थोडावेळ तरी चालल पाहिजे. असे केल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. हा एक उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम तुम्ही दैनंदिन कामात देखील सहज करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.