Learn the benefits of doing pranayama Dainik Gomantak
लाइफस्टाइल

प्राणायाम म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ

प्राणायामाच्या माध्यमातून आपण योग्यरितीने श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे शिकू शकतो.

दैनिक गोमन्तक

Breath is not just air, it is Life! असं कायम म्हटलं जातं. श्वास घेणं म्हणजे केवळ शरीरात हवा भरणं नाही. तर, श्वास घेण्याचीदेखील एक पद्धत आहे. जर आपण योग्य रितीने श्वासोच्छवास केला, तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. विशेष म्हणजे योगाभ्यासातही प्राणायाम करण्याला फार महत्त्व आहे. प्राणायामाच्या माध्यमातून आपण योग्यरितीने श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे शिकू शकतो. परंतु, त्यापूर्वी प्राणायाम म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात.(Learn the benefits of doing pranayama)

कुठल्याही प्रसंगी तुम्ही निरीक्षण करून पाहा. आपल्या मनाच्या अवस्थेचा श्वासावर सगळ्यात अगोदर परिणाम होतो. कधी राग आला, भीती वाटली, अस्वस्थता वाटली तर श्वासही अस्थिर होतो. याउलट झोपेत किंवा मन शांत असेल, तेव्हा श्वासही संथ आणि लयबद्ध असतो. मन आणि श्वासाच्या या नात्यामुळे प्राणायामाचा अभ्यास गरजेचा आहे. मनाच्या अवस्थेप्रमाणे श्वास बदलतो, याउलट प्रयत्नपूर्वक श्वासाच्या गतीमध्ये बदल केला तर मनाच्या अवस्थेत बदल घडू शकतो. ते शांत होऊ शकते. मनाला शांत हो सांगितलं, तर ते होणं खूप कठीण आहे. त्याच्या गतीबरोबर आपण तासनतास भटकत राहू. श्वासाच्या माध्यमातून मनाचं नियंत्रण करण्याचे शास्त्र म्हणजे प्राणायाम.

प्राणायामाचा अर्थ

निरोगी मनुष्य मिनिटाला साधारण १५ वेळा श्वास घेतो, म्हणजे दिवसाला २१ हजार ६०० वेळा. महर्षी पतंजली म्हणतात, ‘‘या नैसर्गिक गतीचा विच्छेद (breaking the pattern) म्हणजे प्राणायाम. मग तो मिनिटाला पंधरापेक्षा जास्त म्हणजे गती वाढवणे किंवा कमी करणे. श्वासोच्छवासाला स्वाभाविक गतीत प्रयत्नपूर्वक, प्रमाणबद्ध, विशिष्ट फळाच्या उद्देशाने बदल करणे म्हणजे प्राणायाम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT