Daily Yoga : दंडासान कसे करावे ? जाणून घ्या त्याचे फायदे

Daily Yoga: How to do Dandasana? Learn its benefits
Daily Yoga: How to do Dandasana? Learn its benefits
Published on
Updated on

दंडासन (Dandasana) केवळ शारीरिक समस्यांपासून (physical problems) मुक्त करत नाही, तर एकाग्रता वाढवते (Increases concentration) आणि श्वसनही सुधारते

दंडासन कसे करावे? 

चटई घेऊन त्यावर पोटावर झोपा. दोन्ही हात छातीजवळ नेऊन खांदे वर घ्या. हातावर वजन टाकून वर उठा व पायांच्याही बोटांना जमिनीला टेकवून अंग जमिनीपासून वर घ्या.
आता तुम्ही अशा अवस्थेत आहात की जमिन आणि शरीरामध्ये ९० अंशाचा कोन बनेल.
यामध्ये हातावर आणि खांद्यांवर सर्व भार न देता पोटाचे स्नायू आवळून गुरुत्वाकर्षणाविरुध्द शरीर वर उचलून ठेवा. डोकं शरीराप्रमाणे सरळ ठेवून समोर बघा.
या स्थितीत किमान १० सेकंदांपर्यंत किंवा तुमच्या क्षमतेनुसार राहा.

दंडासनाचे फायदे कोणते? 
- हे आसन केल्यास दंड, मांड्या, खांदे आणि मनगट मजबूत होतात. 
- ओटीपोटातील स्नायू बळकट होतात. 
- ओटीपोट आणि मांड्यांतील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते. 
- कमरेचे स्नायू बळकट होतात. 
- शरीराची ठेवण उत्तम होण्यास मदत होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com