Kitchen Hacks | Don't put These Things in Refrigerator Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: महिलांनो, तुम्हीही 'या' गोष्टी रोज फ्रीजमध्ये ठेवता? मग आजच बंद करा ही सवय; अन्यथा...

अशा दहा गोष्टी आहेत ज्या आपण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत

दैनिक गोमन्तक

Kitchen Hacks: अनेकदा खाण्या-पिण्याचे पदार्थ लवकर खराब होतात, त्यामुळे ते ताजे राहण्यासाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. पण अशा दहा गोष्टी आहेत ज्या आपण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी त्या 10 गोष्टींबद्दल सांगितले जे आपण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये.

ब्रेड

फ्रिजमध्ये ब्रेड ठेवणे बंद करा, कारण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्याने तो लवकर खराब होते आणि तो कडकही होतो. त्यामुळे त्यातील पोषक मूल्येही होऊ लागतात.

टोमॅटो

टोमॅटोचा वापर जवळपास सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो, परंतु ते फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव आणि पोत दोन्ही खराब होतात.

मध

मध वापरल्यानंतर तो कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये, कारण तो घट्ट होतो आणि त्यात क्रिस्टल्स तयार होतात.

टरबूज

थंड टरबूज खायला सर्वांनाच आवडते, पण टरबूज कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. एवढेच नाही तर त्याचा रंग आणि चवही बदलते.

बटाटा

आपण चुकूनही बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण बटाट्यामध्ये स्टार्च असते आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील साखरेचे प्रमाण वाढते.

कांदा

कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो ओलावा फार लवकर शोषून घेतो आणि खराब होतो.

लसूण

फ्रिजमध्ये लसूण ठेवल्यास त्यातून कोंब फुटतात आणि त्याची चवही खराब होते, अशावेळी लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये.

केळी

केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण त्यामुळे त्याचा रंग, पोत आणि चव खराब होते आणि केळी बाहेरून काळी पडू लागतात.

कॉफी

होय, कॉफी देखील फ्रीजमध्ये कधीही ठेवू नये, कारण ती फ्रीजमधील ओलावा शोषून घेते आणि कडक होते. इतकेच नाही तर इतर गोष्टींच्या संपर्कात आल्याने कॉफीची चवही बिघडते.

ऑलिव तेल

मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी देखील सांगितले की तुम्ही कधीही ऑलिव्ह ऑईल फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण ते घट्ट होते. त्यात क्रिस्टल्स तयार होऊ लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT