Kidney Problem Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kidney Problem: 'हे' 3 लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब व्हायला सुरूवात झालीये

किडनी निकामी झाल्यास विषारी पदार्थ शरीरीत जमा होऊ लागतात यामुळे अनेक आजार डोकंवर काढतात.

दैनिक गोमन्तक

Kidney Problem: किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आरोग्यासाठी किडनीचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे.

हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. आपण दिवसभर जे आरोग्यदायी आहार घेतो. त्यामुळे अनेक अनारोग्यकारक घटक शरीरात प्रवेश करतात. हे घटक इतके विषारी असतात की, शरीरात दीर्घकाळ राहिल्यास शरीरातील इतर अवयव निकामी होऊ शकतात.

नुकतीच टीव्ही मालिका ये रिश्ता क्या कहलाता है फेम शिवांगी जोशी किडनी इन्फेक्शनच्या विळख्यात आली होती. हॉस्पिटलच्या बेडवरून आजारी पडल्याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. किडनी आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. 

  •  वजन कमी होणे

जेव्हा किडनी सरळित कार्य करत नाही, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण खूप वाढू लागते. त्यामुळे भूकेमध्ये फरक पडतो. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

भूक कमी लागण्यासोबतच सकाळी उलट्या होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. असे होऊ शकते की पोट सतत भरलेले असते. काहीही खावेसे वाटत नाही. अशा लक्षणं दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करु नका.

weight loss
  • अंगावर सूज येणे

हे एक किडनी निकामी होण्याचे आणखी एक गंभीर लक्षण आहे. किडनी शरीरात येणारे अतिरिक्त सोडियम काढून टाकण्याचे काम करते. परंतु जेव्हा किडनीचे काम विस्कळीत होते तेव्हा सोडियम शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे पायांवर सूज दिसून येते. याशिवाय डोळे आणि चेहऱ्यावर सुज येते.

swelling
  • रात्री वारंवार लघवी होणे

किडनीमध्ये व्यत्यय येण्याचे आणखी एक संकेत आहे. हे ओळखणे फार महत्वाचे आहे. रात्री सारखे सारखे लघवी येत असेल तर वेळीच सावध व्हा. साधारणपणे मधुमेह असल्यास सारखे सारखे लघवीला जावे लागते. अन्यथा किडनीच्या समस्या असु शकतात.

urine

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आरटीआयचा ऐतिहासिक विजय! 33 वर्षांनंतर कांदोळी ग्रामपंचायतीने हुडकून काढल्या 'त्या' नोंदी

Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

Viral Video: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत घाणेरडा प्रकार; खाली उभ्या असणाऱ्या तरुणाने केले अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल!

Goa Government Schools: शाळा वाढल्या पण बाकडी रिकामी! 6 वर्षांत 49 सरकारी शाळा बंद, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८ ने वाढ!

डोंगर माफियांची खैर नाही! डोंगरकापणीवरून कुठ्ठाळीतील राजकारण तापले; चौकशीच्या फेऱ्यात अडकणार दोषी

SCROLL FOR NEXT