Ear Pain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ear Pain Home Remedies: तुम्हाला कानदुखीची समस्या असेल तर ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

जर तुम्हाला अचानक कानात वेदना होत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

Ear Pain Home Remedies: कान दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा कानात घाण किंवा पाणी गेल्याने कान दुखू शकतात. याशिवाय, कधीकधी कानात काही सामान्य संसर्गामुळे वेदना होतात आणि त्यामुळे कान सुजलेला दिसतो. 

त्याचबरोबर काही वेळा दातदुखीमुळे कानात वेदनाही सुरू होतात. पण जर कानात दुखणे सडल्यामुळे होत असेल तर अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच जर तुम्हाला अचानक कानात वेदना होऊ लागल्या, तर अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून कानदुखी कमी करू शकता.

मोहरीचे तेल

कानात अडकलेले मेण वितळण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर मानले जाते. या तेलाचे 2 ते 3 थेंब कानात टाकल्याने फायदा होतो. यासाठी डोके एका बाजूला झुकवावे आणि दुसऱ्या कानाच्या बाजूने तेल ओतावे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे असेच डोके वाकवून ठेवा. 

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय कांद्यामुळे कानदुखीपासून आराम मिळतो. यासाठी एक चमचा कांद्याचा रस कोमट करून त्याचे 2-3 थेंब कानात टाकावे. असे दिवसातून 2-3 वेळा केल्याने कान दुखण्यापासून आराम मिळतो. 

लसूण

हा उपाय वापरण्यासाठी लसणाचे 2 तुकडे ठेचून घ्या आणि 2 चमचे मोहरीच्या तेलात शिजवा. लसूण थोडा काळा झाल्यावर तेल थंड करा आणि या तेलाचे एक ते दोन थेंब संक्रमित कानात टाका. लसूण वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहे आणि ते त्वरित आराम देखील देते. 

पुदिना

कान दुखत असल्यास तुम्ही पुदिना वापरू शकता. यासाठी ताज्या पुदिना पानांचा रस काढा आणि 1-2 थेंब कानात टाका, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT