Reuse Tips
Reuse Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reuse Tips: दिवाळीतील रिकाम्या मिठाई बॉक्सचा 'असा' करा घरगुती कामांसाठी वापर

Puja Bonkile

Reuse Tips: दिवाळीचा सण मिठाईशिवाय अपूर्णअसतो. आपल्या सर्वांना घरी फक्त 1-2 नाही तर मिठाईचे अनेक बॉक्स मिळतात. यामुळेच दिवाळीनंतर घराची साफसफाई करताच घरात अनेक रिकामे बॉक्स दिसतात. मिठाईचा रिकामा बॉक्स फेकून देण्याचा विचार करत असाल तर थांबा कारण तुम्ही त्याचा घरगुती कामांसाठी करू शकता. 

  • इतर पदार्थ ठेवणे

दिवाळीतील रिकामे मिठाईचे बॉक्स पुन्हा वापरण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यात इतर खाद्यपदार्थ ठेवणे. जर तुमचा बॉक्स 4 भागांमध्ये विभागला असेल तर तुम्ही त्यात बिस्किटे, नमकीन, चिप्स आणि इतर मसालेदार पदार्थ ठेवू शकता. 

जर बॉक्स वेगवेगळ्या भागात विभागला नसेल तर तुम्ही त्यात कोणतीही एक वस्तू ठेवू शकता. याच्या मदतीने तुमचा बॉक्स देखील वापरला जाईल.

  • रिकामे प्लॅस्टिक बॉक्स

आजकाल मिठाई प्लॅस्टिकच्या डब्यातही मिळते. जर तुमच्या घरी प्लास्टिकचा रिकामा बॉक्स असेल तर त्याचा वापर पीठ, भाजीपाला इत्यादी गोष्टी ठेवण्यासाठी करू शकता. 

यासोबतच जर बॉक्स थोडा मोठा आणि खोल असेल तर त्यामध्ये तुम्ही झाडेही लावू शकता. अशा बॉक्समध्ये झाडे सहज वाढतात. 

  • घर सजवण्यासाठी उपयोग

रिकाम्या मिठाईचे बॉक्सही सजावटीसाठी वापरू शकता. तुम्हाला फक्त कागदाच्या किंवा रंगाच्या मदतीने बॉक्स सजवावा लागेल आणि तो टेबलच्या मध्यभागी ठेवावा लागेल. नंतर मिठाईच्या डब्यावरच पाण्याचे ग्लास आणि खाण्याचे ट्रे इत्यादी ठेऊ शकता. यामुळे थोडासा हटके लुक मिळतो. 

  • इतर उपयोग

या सर्व गोष्टींबरोबरच तुम्ही वस्तू ठेवण्यासाठी मिठाईचे रिकामे बॉक्स देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त बॉक्सला कपाट किंवा ड्रॉवरचा आकार द्यावा लागेल. आता त्यात सुई, धागा आणि अशा छोट्या महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षितपणे ठेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

SCROLL FOR NEXT