Aloo-Chana Dal Pakoda:
Aloo-Chana Dal Pakoda: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Recipe Of The Day: पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-चणा डाळ पकोड्यांचा घ्या आस्वाद

दैनिक गोमन्तक

पावसाळ्यात मसालेदार आणि गरमागरम नाश्ता खाण्याची मजा काही औरच असते. पाऊस सुरू होताच लोकांना वेध लागताता ते गरम गरम पकोडे खाण्याची! मान्सूनचे आगमन झाले आहे, यामुळे अनेकांच्या घरांतही विविध प्रकारचे पकोडे बनण्यास सुरुवात होणार आहे. पकोडे भारतीयांना लोकप्रिय आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या राज्यात पकोड्यांचे विविध प्रकार प्रसिद्ध आहेत. बटाटे, कांदे, मिरची इत्यादी पकोडे साधारणपणे प्रत्येक स्वयंपाकघरात बनवले जातात. पण पकोड्यांच्या व्हरायटीमध्ये काही नवीन हवे असेल तर तुम्ही डाळ पकोडे बनवू शकता. चला तर मग जाणुन घेउया हरभरा डाळीचे कुरकुरे आणि मसालेदार पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी. (Aloo-Chana Dal Pakoda Recipe News)

* चणा डाळ आणि आलू पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

चणा डाळ

बटाटे

धने पावडर

गरम मसाला

आले

लसूण

हिंग

हिरव्या मिरच्या

काश्मिरी लाल मिरच्या

तेल

गरजेनुसार मीठ

* आलू चना डाळ पकोडे बनवण्याची पध्दत

हरभरा डाळ धुऊन पाण्यात 3 ते 4 तास भिजत ठेवा.

नंतर भिजवलेल्या डाळीत हिरवी मिरची, आले, लसूण, हिंग बारीक करून घ्या

उकडलेले बटाटे मॅश करा.

उकडलेले बटाटे डाळीच्या पेस्टमध्ये मिक्स करा.

या पेस्टमध्ये गरम मसाला, मीठ, लाल तिखट मिसळा.

जर पेस्ट घट्ट असेल तर थोडे पाणी घाला.

एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा.

कढईत चणा डाळ पेस्ट टाकून डंपलिंगचा आकार द्या.

पकोडे दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावे.

कुरकुरीत आलू चना डाळ पकोडे तयार आहेत. तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत याचा आस्वाद घेउ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahadev Betting App Case: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: धारगळ येथे उच्चदाब वीजवाहिनीला धक्का, सहा वीजखांब कोसळले

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT