Hotel Booking Basic Tips, Hotel Booking Tips, How to book hotel room  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hotel Booking Basic Tips: हॉटेल बुक करतांना 'या' गोष्टीं ठेवा लक्षात

दैनिक गोमन्तक

तुम्ही ट्रिपवर जात असाल तर डेस्टिनेशनपासून ते शॉपिंगपर्यंत सगळ्या गोष्टींचे नियोजन करता, पण अनेकदा हॉटेलबाबत (Hotel) आपण जास्त विचार करत नाही. सकाळी पोचल्यावर कुठलेही हॉटेल बुक करू किंवा प्रवासादरम्यानच (Travel) एखादे बजेट हॉटेल बघू, असा तुम्ही विचार करत असाल. पण यामुळे आपल्याला हवे तसे हॉटेल मिळत नाही आणि सोय देखील मिळत नाही. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. यामुळे हॉटेल बूककरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. (Hotel Booking Tips)

* हॉटेल्स सकाळी जास्त महाग असतात

हॉटेल्स बूक करतांना सकाळी बूक करणे टाळावे. कारण सकाळी हॉटेल महाग असतात. यामुळे तुम्ही हॉटेल बूक करतांना दुपारी किंवा संध्याकाळी करू शकता.

* जुनी बेडशीट

कोरोना महामारीमुळे स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हॉटेलमधील बेडशीट स्वच्छ दिसत असली तरी पुन्हा बदलून घ्यावी. अन्यथा स्वत: संबोट घेऊन जावे.

* अॅप्सचा वापर करून बुकिंग (How to book hotel room onilne)

हॉटेलच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग केल्यास, तुम्हाला हॉटेल खूप महाग वाटू शकते. अनेक हॉलिडे किंवा हॉटेल बुकिंग अॅप्ससह, तुम्हाला हॉटेल बुकिंग स्वस्त वाटते कारण त्यात बरेच कूपन कोड उपलब्ध असतात.

* हॉटेलच्या कोपऱ्यातील रूम मोठ्या असतात

बहुतेक लोकांना हे माहित नसते की हॉटेलच्या कोपऱ्याच्या बाजूच्या रूम मोठ्या असतात. म्हणून जर तुम्ही फॅमिली ट्रिपवर असाल किंवा त्याच बजेटमध्ये मोठी खोली हवी असेल तर तुम्हाला कॉर्नर साइड रूमची निवड करू शकता.


* हॉटेल सिक्युरिटी आणि सेफ्टी

हॉटेलच्या रूममध्ये आणि हॉटेलच्या टॉयलेटमध्ये कुठेही गुप्त कॅमेरे बसवलेले नाहीत हे एकदा तपासले पाहिजे.यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भूतानी इन्फ्रा! लोकांच्या माथी खापर फोडू नका; संपादकीय

Fit Goa Police Mission: पोलिसांना Fit ठेवण्यासाठी गोव्यात Fit Goa Police मिशन!!

Whale Fishing: सोशल इंजिनिअरिंगद्वारे देवमाशाची शिकार! सायबर फ्रॉडचा आधुनिक फंडा

Goa Today's News Live: गोव्यात पावसाची विश्रांती; ‘पारा’ वाढू लागला

Margao: मी शपथ घेतो की, 'पंधरा दिवसांत मडगाव चकाचक करणार'; पालिकेचे स्वच्छता ही सेवा अभियान

SCROLL FOR NEXT