Home Remedy: आजकाल खराब लाइफस्टाइल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना पचनाशी संबंधित समस्या भेडसावत आहेत, त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे घरगुती उपाय करतात आणि बरेच लोक बाजारात उपलब्ध असलेल्या पाचक गोळ्यांचा वापर करतात.
पण बाजारात उपलब्ध पाचक गोळ्या बनवण्यासाठी अनेक प्रकारचे कृत्रिम स्वाद, सुगंध आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जातो आणि या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
यामुळे तुम्ही गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोट फुगणे या समस्या दूर करण्यासाठी जिऱ्यापासून गोळी तयार करू शकता.
जिरे पाचक गोळी
जिरे या पदार्थ पाचक आहे. जिरे पचनाशी संबंधित समस्यांवर खूप फायदेशीर आहे आणि यामुळे गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवत नाही. तुम्ही यापासून घरीच गोळी बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.
जिरं पाचक गोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
जिरं - 2 चमचे
कैरी पावडर - 2 चमचे
किसलेला गूळ - 1 टीस्पून
काळे मीठ - 1/4 टीस्पून
साधे मीठ - 1/4 टीस्पून
लिंबाचा रस - 1 टीस्पून
चूर्ण साखर - 1 टीस्पून
कृती
ही गोळी बनवण्यासाठी सर्वात पहिले जिरं कोरडे भाजून घ्यावे आणि नंतर थंड झाल्यावर त्याची पावडर करावी. यानंतर जिरेपूडमध्ये कैरीपूड, काळं मीठ, साधे मीठ, लिंबाचा रस आणि गूळ घालून पीठ तयार करा आणि नंतर पिठाचा थोडासा भाग घेऊन लाटून त्याला गोल आकार द्या. यानंतर तयार केलेल्या गोळ्या पिठीसाखरात घालून मिक्स करा.
पुढील समस्या होतील दूर
गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोट फुगण्याची समस्या कमी होईल.
पचनसंस्थासुरळित कर्य करते.
चयापचय आणि चरबी जाळण्याची क्षमता वाढवते.
त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण आढळतो.
तसेच सर्दी आणि दम्याची समस्या कमी होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.