पोट साफ नसल्याने अनेक आजार डोकं वर काढतात. अनेकांना बद्धकोष्ठतेमुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि डोकेदुखी, गॅस बनणे, मळमळ, भूक न लागणे इत्यादी समस्या उद्भवतात. बद्धकोष्ठतेमुळे होणाऱ्या या समस्या छोट्या वाटल्या तरी समस्या खूप वाढतात. यापासून आराम मिळण्यासाठी आपण अनेक वेळा औषधे घेतो, ज्यामुळे आराम मिळतो पण त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यामुळेच आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. (home Remedies for Constipation News)
बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय
भरपूर पाणी प्यावे -
शरीरात पाण्याची (Water) कमतरता असली तरी बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. याशिवाय रसाचे सेवन करावे.
लिंबूपाणी -
लिंबाचा रस (Lemon Juice) पिल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते. यामुळे शरीरातील विषारी कण निघून जातात. सकाळी लिंबू पाणी किंवा लिंबू चहा प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
पालक -
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आहारात पालकाचा नक्कीच समावेश करा. यामध्ये फायबर, पोटॅशियम, आयरन आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात, जे आरोग्यासोबतच (Health)) ही समस्या कमी करण्यास मदत करतात.
दही -
दह्यामध्ये (Curd) कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
अंजीर-
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर अंजीराचे सेवन खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
हर्बल टी -
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हर्बल टी बनवून पिऊ शकता. अहर्बल चहामध्ये पुदिना आणि आले दोन्हीही घालू शकता. ते प्यायल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.