Height Increase Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Height Increase Diet: मुलांची उंची वाढवायची असेल तर 'हा' आहार ठरेल गेमचेंजर, पालकांनी नक्की वाचावं

Health Tips: मुलांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी पालक नेहमीच सर्वतोपरी काळजी घेतात. मुलं जसजशी मोठी होतात, त्यांचा उंची वाढीचा वेगही विशेषतः एका ठराविक वयोगटात अधिक असतो.

Sameer Amunekar

मुलांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी पालक नेहमीच सर्वतोपरी काळजी घेतात. मुलं जसजशी मोठी होतात, त्यांचा उंची वाढीचा वेगही विशेषतः एका ठराविक वयोगटात अधिक असतो. या कालावधीत संतुलित आणि पोषक आहार घेतल्यास नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यास मोठी मदत होते.

प्रथिने हे शरीराच्या पेशींच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात. हे स्नायूंची मजबुती वाढवतात आणि शरीरातील ऊतींच्या दुरुस्तीसाठी मदत करतात. अंडी, दूध, पनीर, कडधान्ये, सोया, कडू भाज्यांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात.

हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे. उंची वाढताना हाडांचा विस्तार आणि बळकटी आवश्यक असते. कॅल्शियम दूध, दही, चीज, बदाम, हिरव्या पालेभाज्या खाणं चांगलं.

झिंकची कमतरता अनेक वेळा वाढीवर विपरित परिणाम करू शकते. झिंक मुलांच्या शारीरिक वाढीला चालना देतो. पनीर, अंडी, डाळी, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बियांमध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असतं.

व्हिटॅमिन डीमुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण योग्य प्रकारे होते. सूर्यप्रकाश हा याचा नैसर्गिक स्रोत आहे. सूर्यप्रकाश, अंडीचा पिवळा भाग, मशरूम, माश्यांमध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असतं.

शरीराला ऊर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स आवश्यक आहेत. ही ऊर्जा शरीरातील वाढीच्या प्रक्रियेस मदत करते. भात, गहू, नाचणी, रागी, बाजरीमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं.

या गोष्टी टाळा?

  • जास्त प्रमाणात साखर, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड यांचे सेवन टाळावे.

  • धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी वाढीवर प्रतिकूल परिणाम करतात.

  • झोपेचा अभावदेखील हार्मोनल वाढीला अडथळा ठरू शकतो.

उंची वाढवणे हा एक नैसर्गिक आणि हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. यासाठी कोणतीही जादूची गोळी नाही. मात्र योग्य आहार, व्यायाम, झोप आणि सकारात्मक जीवनशैली यांचा समतोल साधल्यास नैसर्गिकरित्या उंची वाढवता येते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. दैनिक गोमन्तक अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT