Children Mental Health: मुलांचं मानसिक आरोग्य सृदृढ ठेवायचं? मग आजपासूनच करा 'या' टिप्स फॉलो!

Manish Jadhav

व्यस्त जीवनशैली

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे मुलांकडे वेळ द्यायला पालकांना अजिबात वेळ नाही. त्यामुळे मुलांचा स्वभाव चीडचीडा, एकलकोंडी बनत चालला आहे.

Children Mental Health | Dainik Gomantak

मुलांना वेळ द्यावा

पण आता या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून मुलांना वेळ देणं गरजेचं बनत चाललं आहे. तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. मुलांचे विचार जाणून घेतले पाहिजे.

Children Mental Health | Dainik Gomantak

मानसिक आरोग्य

आज (18 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून मुलांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत...

Children Mental Health | Dainik Gomantak

शारीरिक ॲक्टिव्हीटी

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी शारीरिक ॲक्टिव्हीटी महत्वाची असते. पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.

Children Mental Health | Dainik Gomantak

मैत्रीपूर्ण संबंध

मुलांच्या मानसिक विकासासाठी मैत्रीपूर्ण संबंध खूप महत्त्वाचे आहेत. एकटे असताना मुले अस्वस्थ असतात त्यामुळे पालकांनी त्यांच्यासोबत विचारांची देवाण-घेवाण केली पाहिजे. त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत.

Children Mental Health | Dainik Gomantak

मुलांना भीती दाखवू नका

मुलांच्या शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकासही खूप गरजेचा असतो. मुलांना कधीही भीती दाखवू नका. मुलांना एखाद्या गोष्टीची भीती दाखवण्याऐवजी त्या गोष्टीविषयी समजावून सांगा.

Children Mental Health | Dainik Gomantak
आणखी बघा