Manish Jadhav
कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.
आज (16 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कॉफी पिण्याच्या तोट्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
कॉफीमध्ये कॅफीन असल्यामुळे ती झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनिद्रा किंवा झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते.
जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास हृदयाचे ठोके वाढतात. तसेच, रक्तदाबसारखी समस्या उद्भवते.
तसेच, जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास आम्लता (acidity), गॅस, पोट फुगणे किंवा अपचन होऊ शकते.
जास्त कॅफीनमुळे चिंताग्रस्तपणा, चिडचिडेपणा किंवा मूड स्विंग्स वाढू शकतात.
संशोधनानुसार, अती प्रमाणात कॉफी प्यायल्यास कॅल्शियमची शोषणक्षमता कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम हाडांवर होतो.