Heart Attack  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Attack: तुमच्याही पायांवर दिसतायत ही लक्षणं? वेळीच व्हा सावध; नाहीतर कधीही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका!

Heaviness In Legs And Heart Disease: पायात जडपणा येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जर ही समस्या कायम राहिली तर लक्ष देणे गरजेचे ठरते आहे.

Manish Jadhav

Heaviness In Legs And Heart Disease: पायात जडपणा येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जर ही समस्या दिर्घकाळ राहिली तर लक्ष देणे गरजेचे ठरते. कारण हे हृदयरोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. चला तर मग पायात जडपणा येणं कोणत्या प्रकारचा असू शकतो आणि कोणत्या समस्या कमजोर हृदयाची लक्षणे असू शकतात? याबाबत हृदयरोग तज्ञांकडून सविस्तररित्या जाणून घेऊया...

जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तर पुरेसे रक्त शरीरात पोहोचत नाही. यामुळे शरीराच्या काही भागात, विशेषतः पाय आणि घोट्यांमध्ये सूज किंवा जडपणासारखी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे मूत्रपिंडाचा आजार, सांधेदुखीची देखील असू शकतात, परंतु जर त्यांच्यासोबत इतर कोणत्याही समस्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

हृदय कमजोर झाल्यास पायांमध्ये कोणती लक्षणे दिसतात?

अपोलो हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. वरुण बन्सल सांगतात, पायांमध्ये सूज येण्याव्यतिरिक्त हृदय कमजोर असताना इतर अनेक लक्षणे देखील दिसू शकतात. ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. जर तुम्हाला थोडीशी हालचाल केल्यानंतर किंवा पायऱ्या चढल्यानंतर पायांमध्ये वेदना होत असतील किंवा जास्त प्रयत्न न करता थकवा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

हृदय कमजोर का होते?

दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे डॉ. अजित जैन सांगतात, हृदय कमजोर होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक ताण किंवा झोपेचा अभाव यांचा समावेश आहे. याशिवाय, जर एखाद्याच्या कुटुंबात हृदयाची समस्या असेल तर त्याला हृदयाशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते.

लक्षणे दिसल्यास काय करावे?

डॉ. अजित जैन यांच्या मते, जर हृदयविकाराशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. त्याऐवजी शक्य तितक्या लवकर तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत आणि गरज पडल्यास चाचण्या कराव्यात. याशिवाय, जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयी सुधारणे फायदेशीर ठरु शकते. रक्तदाब, शुगर किंवा कोलेस्टेरॉल नियंत्रित करुन हृदयरोग टाळता येतो.

प्रतिबंधात्मक उपाय

डॉ. जैन यांच्या मते, हृदयरोग (Heart Disease) टाळण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कमी फॅटयुक्त दूध, मासे, सुकामेवा खाणे चांगले. याशिवाय, दररोज किमान 30 मिनिटे चालावे किंवा योगा करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT