Sameer Amunekar
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयविकाराची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते. खास करून काही भाज्या नियमित आहारात घेतल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते. चला तर पाहूया अशा 5 भाज्या ज्या हृदयासाठी उपयुक्त ठरतात.
पालकात आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारतात. अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ही हिरवी भाजी व्हिटॅमिन K आणि C ने भरलेली असते. यातील फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या पेशींचे संरक्षण करतात. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ब्रोकली उपयुक्त ठरते.
गाजरात बीटा-कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात. हे घटक धमन्यांमध्ये चरबी साचू देत नाहीत. यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
भेंडीतील सॉल्युबल फायबर्स शरीरातले खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. शिवाय ती पचनक्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवते.
टोमॅटोमध्ये 'लायकोपीन' नावाचा अँटीऑक्सिडंट असतो, जो हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तो कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करतो आणि रक्तदाबही संतुलित ठेवतो.