
हृदय शस्त्रक्रियेनंतर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. जर या गोष्टींची काळजी घेतली नाही तर रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. तसेच, हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी इतरही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चला तर मग हृदय शस्त्रक्रियेनंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया...
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित जैन सांगतात, हृदय शस्त्रक्रियांचे (Heart Surgery) अनेक प्रकार आहेत, जसे की, ओपन हार्ट, बायपास आणि स्टेंट सर्जरी. यापैकी ओपन हार्ट सर्जरी सर्वात गंभीर आहे. या शस्त्रक्रियेमध्ये जखमेची विशेष काळजी घ्यावी लागते. शस्त्रक्रियेची जखम हृदयाजवळ असल्याने कोणताही संसर्ग प्राणघातक ठरु शकतो. बायपास सर्जरीमध्येही जखमेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तथापि, स्टंट सर्जरीमध्ये खूप विश्रांतीची आवश्यकता असते. यासोबतच आहार आणि दैनंदिन दिनचर्येची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे असते.
हृदय शस्त्रक्रियेनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहाराची काळजी घेणे. आहाराची काळजी घेतल्याने देखील उपचारांमध्ये मदत होते. शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीमध्ये आहाराची महत्वाची भूमिका असते. आहाराद्वारेच आपण सामान्य कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करु शकतो. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवल्याने भविष्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. यासोबतच रक्तदाब नियंत्रणात राहतो, मात्र हे केवळ आहाराद्वारेच शक्य आहे. त्यामुळे हृदय शस्त्रक्रियेनंतर जखमेची तसेच आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते.
हृदय शस्त्रक्रियेतून बरे झाल्यानंतर दैनंदिन दिनचर्येत बदल केले पाहिजेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम आणि सामान्य काम सुरु करावे. 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ सतत उभे राहणे टाळावे. यासोबतच, जड वस्तू उचलणे देखील टाळावे. तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. वजन वाढल्याने हृदयावर ताण येऊ शकतो. तसेच, आहारात (Diet) फायबर ओमेगा-3 आणि पौष्टिक खाद्य पदार्थांचा समावेश करावा. यासोबतच, औषधांची संपूर्ण माहिती ठेवावी, जसे की, किती औषध घ्यावे, कोणते औषध घ्यावे आणि कधी घ्यावे. तसेच, तणावापासून दूर राहावे. याशिवाय, पुरेशी झोप घेण्यासोबत डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.