Heart Attack: पुरुषांपेक्षा वेगळी का असतात महिलांची हृदयविकाराची लक्षणं? जाणून घ्या डॉक्टरांचं मत अन् प्रतिबंधात्मक उपाय

Heart Attack Symptoms In Women: महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे बहुतेकदा सौम्य, अस्पष्ट आणि वेगळी असतात. महिला अनेकदा अशक्तपणा, थकवा किंवा गॅसची समस्या समजून यांकडे दुर्लक्ष करतात.
Heart Attack Symptoms In Women
Heart Attack Symptoms In WomenDainik Gomantak
Published on
Updated on

Heart Aattack Symptoms In Women: हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर समस्या आहे. जर या समस्येची लक्षणे वेळेवर ओळखली तर उपचार शक्य होतात, परंतु थोडासाही निष्काळजीपणा रग्णासाठी जीवघेणा ठरु शकतो. छातीत तीव्र वेदना होणे, डाव्या बाजूला वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही हृदयविकाराची लक्षणे मानली जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, बहुतेकदा महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा खूपच वेगळी आणि सौम्य असतात. महिला अनेकदा अशक्तपणा, थकवा किंवा गॅसची समस्या समजून यांकडे दुर्लक्ष करतात. चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे

थकवा

जास्त काम न करता थकवा जाणवणे हे महिलांमध्ये (Women) हृदयविकाराचे सर्वात कॉमन लक्षण आहे. हा थकवा अनेक दिवस किंवा आठवडे टिकू शकतो.

पाठ, मान, जबडा किंवा खांद्यामध्ये वेदना

बऱ्याचदा महिलांना पाठ, मान, जबडा किंवा खांद्याच्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात. या वेदना हळूहळू वाढू शकतात.

पोटात वेदना

हृदयविकाराच्या वेळी अनेक महिलांच्या पोटात वेदना, जळजळ किंवा जडपणा जाणवू शकतो. ज्याला त्या अनेकदा अ‍ॅसिडिटी किंवा गॅसची समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने ही समस्या गंभीर होऊ शकते.

Heart Attack Symptoms In Women
Heart Attack: महिलांनो ह्रदयविकाराचा धोका टाळायचाय का? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

श्वास घेण्यात अडचण

हृदयविकाराच्या वेळी अनेक वेळा महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो.

उलट्या आणि चक्कर येणे

महिलांमध्ये उलट्या, चक्कर येणे ही देखील हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

निद्रानाश आणि अस्वस्थता

हृदयविकाराच्या काही दिवस किंवा आठवडे आधी, महिलांना निद्रानाश, अस्वस्थता किंवा चिंताग्रस्तता यासारख्या समस्या जाणवू शकतात.

पुरुषांमध्ये हृदयविकाराची लक्षणे

छातीत तीव्र वेदना किंवा दाब.

श्वास घेण्यास त्रास.

अचानक घाम येणे.

चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे.

Heart Attack Symptoms In Women
Heartburn Or Heart Attack: छातीत होणारी जळजळ आणि हृदयविकाराचा झटका यात काय फरक असतो? जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

महिलांमध्ये लक्षणे वेगवेगळी का असतात?

महिलांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याची पद्धत, हार्मोनल बदल आणि शरीराची रचना वेगवेगळी असते.

महिलांमध्ये अनेकदा लहान रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज आढळतात, ज्यामुळे छातीत तीव्र वेदना होत नाहीत.

महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त का असतो?

रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयविकाराचा (Heart Attack) धोका पुरुषांच्या बरोबरीचा किंवा त्यापेक्षा जास्त होतो.

उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, ताण आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो.

महिलांमध्ये लक्षणे सौम्य आणि अस्पष्ट असतात, ज्यामुळे अनेकदा उपचारांना विलंब होतो.

Heart Attack Symptoms In Women
Heart Attack: विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका; संशोधनातून खुलासा

प्रतिबंधात्मक उपाय

महिलांनी शरीर देत असलेल्या सिग्नलकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.

गरज पडल्यास ईसीजी, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि शुगरची चाचणी करुन घ्यावी.

संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा आणि धूम्रपान टाळावे.

जर तुम्हाला तुमच्या शरीरात काही असामान्य लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com