Healthy Breakfast for Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Breakfast for Monsoon: पावसाळ्यात पचायला हलका अन् पौष्टिक असा नाश्ता करायचा असेल तर ट्राय करा 'ही' रेसिपी

तुम्ही मसाला डोसा, पेपर डोसा यासारखे डोसाचे अनेक प्रकार खाल्ले असेल,पण कधी ओट्स डोसा ट्राय केला आहे का?

Puja Bonkile

Healthy Breakfast for Monsoon: पावसाळ्यात सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांनाच असतो. सकाळी ऑफिसला जायची घाई असल्याने झटपट काय बनवावे सुचत नाही.

तुम्ही जर पावसाळ्यात भजे, समोसे आणि पकोडे खाऊन बोर झाला असाल तर आम्ही तुम्हाला आज हेल्दी आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत.

तुम्ही मसाला डोसा, पेपर डोसा यासारखे डोसाचे अनेक प्रकार खाल्ले असेल,पण कधी ओट्स डोसा ट्राय केला आहे का? नाही! तर ही झटपट तयार होणारी आणि हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.

  • ओट्स डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप ओट्स

1/4 कप तांदळाचे पीठ

1/4 कप रवा

1/4 कप दही

अर्धा टीस्पून जिरे

चवीनुसार मीठ

एक कांदा

कढीपत्ता

कोथिंबीर

आल्याचा एक इंच लांब तुकडा

हिरव्या मिरच्या

आवश्यकतेनुसार पाणी

  • ओट्स डोसा बनवण्याची कृती

ओट्स डोसा बनवण्यासाठी आधी रेडी टू इट ओट्स घ्यावे. त्याची बारीक पावडर करा. एका मोठ्या भांड्यात काढावे आणि त्यात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करवे. तसेच चवीनुसार मीठ आणि जिरे घालावे. बारीक चिरलेला कांदा, आल्याचा तुकडा मिक्स करा.

सोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घाला. शेवटी दही घालून मिक्स करावे. आता या बॅटरमध्ये थोडे पाणी घालावे. ओट्स डोसामध्ये पाण्याचे प्रमाण तांदळाच्या डोस्यापेक्षा जास्त असावे. याचे बॅटर एकदम पातळ असले पाहिजे. आता हे बॅटर सेट होण्यासाठी अर्धा तास सोडावे.

आता तवा किंवा पॅन गरम करून त्यावर ओट्स डोसा पसरवा. काही वेळाने उलटा करून प्लेटमध्ये काढा. ओट्स डोसा पीठ पातळ असते, म्हणून ते तव्यावर पसरवण्याची गरज नाही. कोणत्याही चमचाच्या मदतीने तव्यावर टाका आणि सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंगावर शिजवा. नारळ किंवा शेंगदाणा चटणीसह गरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT