आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार ठेवा Hair Cut  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चेहऱ्याच्या आकारानुसार करा Haircut

प्रत्येकांच्या चेहऱ्याचा आकार वेगवेगळा असल्याने त्यांची केशरचना सुद्धा विभिन्न असतात .

दैनिक गोमन्तक

चेहरा सुंदर (Beautiful) आणि स्टायलिश दिसण्यासाठी चांगली हेयर कट (Haircut) करणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक हेयर कट (Haircut) आपल्या चेहऱ्याला शोभून दिसेलच असे नाही. म्हणून आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार (Face shape) हेयर कट करावी. अनेक मुली दुसऱ्या मुलीना पाहून हेयर कट करतात पण ती हेयर कट त्यांच्या चेहऱ्याला शोभून दिसत नाही. तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा आहे आणि त्यावर कोणती हेयर कट अधिक शोभून दिसेल हे जाणून घेणे आवश्यक आहे.

* राऊंड शेप फेस

गोल चेहरा असणाऱ्या महिलेवर जास्त लांब किंवा छोटे केस शोभून दिसत नाही. या प्रकारच्या महिलाना लाँग बॉब कट, क्वीन हेअरकट, बॉब ग्रॅज्युएशन हेअरकट आणि स्टेप हेअरकट यातील कोणतीही हेयरकट शोभून दिसते. यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून दिसतो. तुम्ही कुरळे केस सुद्धा ठेवू शकता.

* ओवल फेस शेप

जर तुमचा चेहरा अंडाकृती आकाराचा असेल तर तुम्ही फेडर कट, पॉइंटी लेयर्स हेअरकट, मल्टी लेयर हेअरकट आणि लाँग लेयर हेअर कट करू शकता. वेव्स किंवा लेयर कट तुमच्या चेहऱ्याला अधिक शोभून दिसेल. स्ट्रेट केस या चेहऱ्याला अधिक चांगले दिसत नाही. श्रद्धा कपूर, कृती सेनन आणि नर्गिस फाखरी यांच्या चेहरा अंडाकृती आहे.

* स्क्वेयर फेस शेप

अनेक महिलांचा चेहरा हा गोल किंवा अंडाकृती असतो. पण चौरस आकार असलेले चेहेरे खूप कमी पाहायला मिळतात. जर तुम्हाला चौरस चेहऱ्याचा आकार समजून घ्यायचा असेल तर करीना कपूर किंवा जॅकलिन फर्नांडिस यांचा चेहरा पाहून कल्पना करू शकता. या चेहऱ्यांवर बॉब क्लासिक हेअरकट, A लाईन लाँग बॉब हेअर कट फुल फ्रिंज हेअरकट आणि पिक्सी हेअरकट शोभून दिसते. या चेहऱ्यावर स्ट्रेट केस शोभून दिसतात.

* हार्ट शेप फेस

हा चेहऱ्याचा आकार आपल्याला क्वचितच दिसतो. पण असा चेहरा असणाऱ्या लोकांवर कोणतीही हेयर कट शोभून दिसते. अशा चेहऱ्यांवर स्ट्रेट केसांसाठी मल्टी लेयर स्टाईल आणि कुरळे केसांसाठी फक्त लेयर हेअरकट अधिक शोभून दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT