Modak  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Festival: मोदक मोदते मजला

दैनिक गोमन्तक

गणपती बाप्‍पा येतो आहे. कुणाचा दीड, कुणाचा पाच, कुणाचा सात तर कुणाचा अकरा दिवसांचा. गणपतीचा आणि माझा स्नेह मी चार वर्षे वयाचा असल्या पासूनचा. गणपती पुढे ठेवलेले उकडीचे आणि गहू पीठाचे मोदक गणपतीने प्रसाद म्हणून तुळशीपत्र ठेवून ‘दाखवून’ झाल्यावर आम्हा भावंडांच्या ताटात यायचे आणि ते अलगद आम्हा मुखी भक्षण होत. तेव्हा आजी आणि आईच्या तोंडावरचे तृप्त भाव ‘आज मम घरी देव जेवला’ असे दिसायचे. ‘गणपती लहान मुलांच्या तोंडून जेवतो हो..,’ आजी आईला सांगायची आणि गणपतीला नमस्कार करत काहीतरी पुटपुटायची. आम्हांला तेव्हा ते काही कळत नसे.

मोदकाच्या सारणातली गूळ, ओले खोबरं, वेलची यांचे त्रिगुणात्मक सुंदर मिश्रण बरोबर जमले की, मग ते सुगंधी वाफेबरोबरच सुगंधी तांदूळ पीठामध्ये खोवले जायचे आणि दोन्ही सुगंध एकजीव होत केवळ बोटांच्या कलेने मोदक सुबक आकार घेत. मोदकाचे कुठलाही साचा उपलब्ध नसताना आजीने आईने बनविलेले मोदक इतके ‘साचेबद्ध’ कसे काय बनत, हे मला पडलेले कोडे आहे. बरे, मोदक हे केवळ वर्षातून एकदाच बनत, त्यामुळे त्याचा वर्षभर सराव नाही. तरी मग आजीला विचारल्यावर ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ असे काहीसे म्हणायची आणि मग आम्हांला आजीने नारळ फोडल्यावर त्याचे पाणीसुद्धा ती सारणात भरायची ते आठवायचं आणि आम्ही त्याप्रमाणे आम्ही तो अन्वयार्थ शब्दशः जोडायचो.

उकडीचे मोदक मोठ्या आकाराचे असत. ती जबाबदारी आजीची असे, तर गहू पीठाचे मोदक तळणाचे असत आणि तो कार्यभार आईजवळ होता. गहू मोदकात हलकाच एखादाच बेदाणा खोवलेला असे. त्याचे पीठ सच्छिद्र असे आणि सारणात ते सामावून घेतले जाई. कढईत सोडलेले मोदक अट्टल पोहणाऱ्यासारखे सूर मारून काळसर कढईचा तळ गाठत आणि वर येताना सोनेरी केशरी रंगाचे तेज घेऊनच वर येत. त्यांच्या कांतेचे ते सुंदर रूप खरेच विलोभनीय असे आणि त्यांचा तेलात सोडताना तो चर्रऽऽ करून येणारा आवाज अजूनही मनाशी साचून राहिला आहे. तो चव, रंग, सुगंध, स्पर्श आणि नाद या पंचेंद्रियांना मोहित करणारा तो मोदक आठवणीच्या सहाव्या इंद्रियाने पुनश्च जागृत होऊन आई, आजीच्या आठवणीत पार मिसळून गेलेला आहे.

केदार साखरदांडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT