Ganesh Chaturthi 2021: दर्शनमात्रे मन-कामना पुर्ती Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2021: दर्शनमात्रे मन-कामना पुर्ती

देशात गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

मखरावरून शेवटचा हात फिरतो आहे. बाबा दोन्ही बाजूंनी फिरून सारं नीट आहे याची खात्री करून घेता आहेत. घरांतली मुलं आपला मौल्यवान सल्ला बाबांना देत आहेत. माटोळीला बांधायची फळे एकत्र करून ठेवली आहेत. अजून काही बाकी राहिलंय का यावर परत प्रत्येकाची देखरेख आहे. आईने समया, दिवल्या साफ करायला घेतल्या आहेत. तिथूनच ती स्वयंपाकघरात तेलात शंकरपाळ्या परतणाऱ्या ताईला सल्ले देत आहे. पायांशी घुटमळणारी मनीमावशी मान उंचावून हे चाललेलं आक्रित विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहते आहे, हे चित्र आज बहुतेकांच्या घरात दिसत असेल.

घर थाटाचं असो वा चंद्रमोळी, उद्या घरात पाऊलं टाकणाऱ्या गणपतीची ‘प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन’ म्हणत सारेजण मखरात आणि आपल्या अंतरात प्राण-स्थापना करतील. शेंदूराची उटी सर्वांगी लेपून असलेल्या, मुक्ताफळांची झळकती माळ गळ्यात घालून असलेल्या त्याची ती मूर्ती अखंडपणे ‘डोळ्यांंनी पाहीन रूप तुझे’ अशा भावात उन्मनित होत निरखताना ‘त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्र्च सखा त्वमेव’ अशा अनन्यभावात आपल्या साऱ्या अन्य नात्यांची जटील जंजाळे, त्याच्या चरणी अर्पण करून टाकतील. इतकंच नाही तर ‘कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा...’ अशा वैरागी वचनातून, हे देवा, माझी काया, माझी वाचा, माझी इंद्रिये, माझी बुध्दी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांच्या योगाने मी जी काही कर्मे करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. असा विचार निष्काम उर्मीने त्याच्या चरणाशी मांडतील.

सारी सजावट, सारी पंचपक्वान्ने, नव्या-कोऱ्या वस्त्रांचा थाटमाट वजा केल्यास, अर्पणभावाने केलेल्या गणपती पूजेचे सार इतकेच तर राहते. आपल्या साऱ्या मनोकामनांची पूर्ती सारे भोग प्राप्त करून नव्हे तर ‘त्याच्या’ दर्शनाने आपल्या हृदयात उमलून आलेल्या समर्पणाच्या वृत्तीनेच तर होणार आहेत!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT