Ganesh Festival 2021: गणपती आले... अन्नब्रम्हाचा उत्सव

चतुर्थीच्या काही दिवस आधीपासून या रसयज्ञाची जय्यत तयारी सुरू व्हायला लागते.
Ganesh Festival 2021: गणपती आले... अन्नब्रम्हाचा उत्सव
Ganesh Festival 2021: गणपती आले... अन्नब्रम्हाचा उत्सव Dainik Gomantak
Published on
Updated on

श्रावण - भाद्रपद महिन्यात स्वयंपाकघरातले गंधच बदलून जातात. त्यात श्रावण महिन्यात पूजल्या जाणाऱ्या साऱ्या देव-देवतांचे पवित्र संकेत असतातच, पण भाद्रपदाच्या सुरुवातीला येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तयारीचा दरवळही असतो. लाडू, मोदक, करंज्या तर झाल्याच पाहुण्या-राऊळांच्या जिभेच्या स्वादरसांची शांती करण्यासाठी उपयोजलेल्या इतर पदार्थांची जंत्रीही असते. शेव-चिवड्यांची खमंग ताठरता, चकल्या- चुरम्याचा बशीमधला कुरकुरीत थाट डोळ्यांना आधी निववतो अणि मग चवीचवीने तो जिव्हेलाही सुखवत जातो. चतुर्थीच्या काही दिवस आधीपासून या रसयज्ञाची जय्यत तयारी सुरू व्हायला लागते.

Ganesh Festival 2021: गणपती आले... अन्नब्रम्हाचा उत्सव
Ganesh Chaturthiच्या मुहूर्तावर गोव्यातील स्वीट मार्टवर कारवाई

चतुर्थीची सुरुवात होते ‘तय’ किंवा गौरी पूजनाने. त्या दिवशी पाच भाज्या मिळून केलेली भाजी हा ताटातला विशेष पदार्थ असतो. साधेपणी उकडून ही भाजी बनवली जाते. ही भाजी फक्त गौरीपूजनाच्या दिवशीच बनवली जाते. त्याशिवाय या दिवशी हळदीच्या पानांत घालून शिजवलेल्या ‘पातोळ्या’ ही पानात असतात. मात्र ‘तय’ साठी बनवलेल्या पातोळ्यात मीठ मात्र टाकले जात नाही. कमी मीठ असलेले पदार्थ हे गौरीच्या गरोदरपणीच्या इच्छा भागवण्यासाठी आहेत अशी भावना त्यामागे असते आणि चतुर्थीच्या दिवशी तर का सांगावं? विविध पद्धतीने बनवलेल्या पक्वान्नांचा देखावा केळीच्या पानावर मांडलेला दिसतो. त्यात मोदक आणि करंज्या असतातच, पण आंबाड्याचे सासव, खतखते, अळुची पातळ भाजी, मुगाच्या गाठी, पुरी, मणगणे, चण्याचा रोस असा नयनरम्य मेळ असतो. यामधलं खतखते तर जिभेवरच्या साऱ्या रसनांबरोबर रास खेळून जाते.

Ganesh Festival 2021: गणपती आले... अन्नब्रम्हाचा उत्सव
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर

चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे पंचमी त्या दिवशी खतखते तर असतंच. पण अळसांद्याचे तोणाक आणि उड्डामेथी रोस खतखत्याला झणझणीत साथ द्यायला पानांवर हजर असतात. निरपणसाची तळलेली कापे पानाला पूर्णत्व देतात. गणेश उत्सवातल्या या दोनही दिवशी डाळीपासून केलेलं वरण नम्रपणे या पदार्थांना साथ देत असते. भातावर तूप-वरण ओतून घेतलेल्या घासाने दोन दिवसांच्या अन्नब्रह्म यज्ञाची सांगता तृप्ततेने होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com