गोवेश्वर महाशिव मंदिरात कलशारोहण! CM सावंतांच्या हस्ते भव्य पिंडीचे पूजन; साधुसंत, भाविक मोठ्या संख्येने सहभागी Watch Video

Old goa goveshwar mahashiva temple: धार्मिक विधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक मंदिराबाहेर येऊन पूजाविधी झाल्याचे व मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले झाल्याचे जाहीर केले.
Old goa goveshwar mahashiva temple
Old goa goveshwar mahashiva templeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जगद्‍गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या बायंगिणी - जुने गोवे येथील भव्य गोवेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा विधीवत व मोठ्या थाटामाटात झाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम झाले.

धार्मिक विधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक मंदिराबाहेर येऊन पूजाविधी झाल्याचे व मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले झाल्याचे जाहीर केले आणि मंडपातील हजारो भक्तांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या सोहळ्यात जगद्‍गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी, प. पू. कानिफनाथ महाराज तसेच देशभरातून आलेले वेगवेगळ्या आखाड्याचे साधुसंत यांची उपस्थिती होती.

सर्व धार्मिक विधी नाशिकचे वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्री शौचे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

मुख्यमंत्री सावंत यांचे सकाळी कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांनी मंदिर व सर्व परिसर पाहिला. मंदिराच्या उभारणीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. गोवेश्वर महाशिव मंदिरातील सहा फूट उंचीच्या पिंडीचे पूजन केले.

Old goa goveshwar mahashiva temple
Mahashivratri 2026: ओम नमः शिवाय! गोव्यात महाशिवरात्रीची जय्यत तयारी; कुठे, काय असणार कार्यक्रम? पहा..

त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण झाले. कलशारोहणावेळी मंदिरावर ध्वजारोहणही करण्यात आले. गेले तीन दिवस सुरू असलेल्या या भव्य सोहळ्याची आज सांगता झाली. संपूर्ण सोहळ्यात साधुसंत, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, तेलंगना, छत्तीसगड, मध्यप्रदेश यासारख्या अनेक राज्यांतून हजारो भाविक गोव्यात दाखल झाले होते.

Old goa goveshwar mahashiva temple
Goa's Mahashivratri 2025: रुद्रेश्वर मंदिरात होणार आध्यात्मिक पर्यटनाचा विकास; मुख्यमंत्र्यांकडून शिवमंदिरात सेवा अर्पण

स्वामींकडून ऐतिहासिक कामगिरी

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘गोव्याच्या संस्कृतीला मोठी परंपरा आहे. मध्यंतरीच्या काळात ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो सफल झाला नाही. जगद्‍गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांनी उभारलेल्या या मंदिरामुळे गोव्याच्या संस्कृतीत भर पडली आहे. ती आणखी पाचशे वर्षे जिवंत राहील एवढे ऐतिहासिक काम स्वामीजींनी केले आहे. त्यांनी नेहमीच रंजल्या - गांजल्यासाठी काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com