Goa Crime: 25 लाख घेतले, फ्लॅटही विकला नाही! दाबोळीतील धक्कादायक प्रकार; संशयितांना अटकपूर्व जामीन

Dabolim flat sale fraud: आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हजेरी लावणे अनिवार्य आहे, पासपोर्ट जमा करणे व अन्य अटीवर संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
Dabolim flat sale fraud
Dabolim flat sale fraudDainik Gomatnak
Published on
Updated on

मडगाव: दाबोळी येथे निवासी फ्लॅट विकण्याचे आमिष दाखवून २५.७४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वास्को पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या रिचर्ड स्वामी आणि राजेश्वरी आचारी या दोघांना दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

वाडे - वास्को येथील रहिवासी पिदाद नुन्स फुर्तादो यांनी या दोघा संशयितांवर पोलिसात तक्रार केली होती. ५ डिसेंबर २०२२ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत फसवणुकीची वरील घटना घडली होती.

चिखली येथील रिचर्ड स्वामी आणि राजेश्वरी आचारी या दोघांनी तक्रारदार फुर्तादो यांना दाबोळी येथील ‘प्रभू सिग्नेचर’ इमारतीतील एक जुना, डबल बेडरूम फ्लॅट विकायचा असल्याचे सांगून त्यासाठी २५.७४ लाख रुपये घेतले होते.

Dabolim flat sale fraud
Goa Crime: "तुम्ही अश्लील कंटेंट शेअर केलाय..." सायबर भामट्याची धमकी ठरली जीवघेणी; छळाला कंटाळून वास्कोतील वृद्धाची आत्महत्या

पैसे घेऊनही संशयितांनी फुर्तादो यांच्या नावावर विक्री करार केला नाही व पैसेही परत केले नाहीत. मागाहून आपण फसविलो गेलो हे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने संशयितांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. २५ हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच रकमेचा हमीदार सादर करणे, तपासात सहकार्य करावे,

Dabolim flat sale fraud
Cyber Crime: 'सायबर फसवणूक' झाली तरी टेंशन नको! आता 'RBI' देणार 85 टक्यांपर्यंत 'भरपाई'

पुराव्यांशी छेडछाड करू नये, न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे, १६ फेब्रुवारीपासून एक आठवडा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वास्को पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हजेरी लावणे अनिवार्य आहे, पासपोर्ट जमा करणे व अन्य अटीवर संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com