Fengshui Tip For Home: वास्तूप्रमाणेच फेंगशुईमध्येही काही खास उपाय सांगितलेले आहेत. पण फेंगशुई शास्त्रानुसार घरामध्ये किंवा आजूबाजूला ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असते. फेंगशुईमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या जीवन शांत आणि आनंदी बनवण्यास मदत करतात. फेंगशुई दोन शब्दांपासून बनलेला आहे. यामध्ये फेंग म्हणजे वारा आणि शुई म्हणजे पाणी. फेंगशुईनुसार घराची सजावट केल्याने घरात सुख-शांती येते.
फेंग शुईनुसार तुमचे घर अशा प्रकारे सजवा
फेंगशुईमध्ये बेडरूमसाठी खास जागा सांगितली आहे. लोक झोपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी बेडरूमचा वापर करतात. फेंगशुईनुसार व्यायाम आणि शिलाई किट किंवा संगीताशी संबंधित वस्तू बेडरूममध्ये अजिबात ठेवू नका. बेडरूममध्ये या गोष्टी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच बेडरूममध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो ठेउ नका.
लिव्हिंग रूमसाठी उपाय
फेंगशुईनुसार लिव्हिंग रूममध्ये फर्निचर ठेवताना विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यात ठेवलेले फर्निचर दाराच्या दिशेने असावे. जेणेकरून खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला आतमध्ये येणारे-जाणारे लोक पाहता येतील. लिविंगरूमध्ये खुर्ची नेहमी भिंतीजवळ ठेवावी. फेंगशुईनुसार सोफा किंवा खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची पाठ हवेत राहू नये.
स्वयंपाकघरासाठी खास उपाय
घरात स्वयंपाकघराला विशेष स्थान आहे. फेंगशुईनुसार स्वयंपाकघरात अशी कोणतीही गोष्ट ठेवू नका जी तुम्ही वापरत नाही. खराब झालेल्या आणि न वापरलेल्या वस्तू स्वयंपाकघरातून काढून टाकाव्या. असे मानले जाते की स्वयंपाकघर जितके सामान कमी तितकाच घरात आनंद असतो.
बाथरूमसाठी उपाय
जर बाथरूमची भिंत आणि तुमच्या पलंगाचे डोके सारखेच असेल तर बाथरूमच्या भिंतीवर बाहेरून आरसा लावावा. यानंतर बाथरूमला लाइट रंग द्यावा. यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.