Energy Drinks 
लाइफस्टाइल

Energy Drinks: एनर्जी ड्रिंक्सचे सेवन वाढवते कॅन्सरचा धोका; नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Energy Drinks Can Cause Cancer: टॉरिनचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. रक्ताचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांसाठी हे अधिक हाणिकारक आहे, असे अभ्यासातून समोर आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

एनर्जी ड्रिंक्स अधिक पिणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारी बातमी समोर आली आहे. एनर्जी ड्रिंक्स अतिप्रमाणात पिल्यास कर्करोगाचा धोका वाढतो, असे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. एनर्जी ड्रिंक्समध्ये टॉरिन नावाच्या घटकामुळे ल्युकेमिया कर्करोगाचा धोका वाढतो, असे नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

टॉरिन नावाचा घटक कर्करोगाच्या पेशींना वाढण्यास आणि जिंवत ठेवण्यास मदत करतो. विशेषत: ल्युकेमिया कर्करोगाच्या रुग्णांमध्ये हा धोका अधिक असतो असे नेचर जर्नलमधील अभ्यासात म्हटले आहे. टॉरिन हे अमायनो अॅसिड असून ते मांस आणि मासे यांच्यात आढळते. याचा एनर्जी ड्रिंक्समध्ये देखील सर्रास वापर केला जातो. पण, या टॉरिनचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. रक्ताचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांसाठी हे अधिक हाणिकारक आहे, असे अभ्यासातून समोर आले आहे.

रॉचेस्टर विद्यापीठात या प्रकरणी करण्यात आलेल्या संशोधनातून काही निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. टॉरिनचे अतिसेवन केल्याने उंदरात कर्करोग वाढीस लागल्याचे निष्पन्न झाले आहे. टॉरिन घेतलेल्या उंदरांमध्ये मृत्यूचा धोका तीन पटीने वाढल्याचे देखील दिसून आल्याचा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला आहे. ग्लायकोलायसिसच्या माध्यमातून टॉरिन कर्करोगाच्या पेशी ग्लुकोजमध्ये तोडण्याचे काम करतो. यामुळे कर्करोगच्या वाढीस चालना मिळते, असे संशोधकांचे मत आहे.

दरम्यान, यापूर्वी केमोथेरपीच्या दुष्परिणाम रोखण्यासाठी टॉरिन फायदेशीर असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले होते. टॉरिनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने त्याचा फायदा होतो असे मत संशोधकांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आता हेच टॉरिन कर्करोगाच्या वाढीसाठी पोषक ठरु शकते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

नव्या अभ्यासातून समोर आलेल्या या माहितीमुळे एनर्जी ड्रिंक्सच्या माध्यमातून केले जाणारे टॉरिनच्या सेवनाबाबत प्रश्न उपस्थित होते. विशेषत: कर्करोगाच्या रुग्णांसाठी ते अधिक धोक्याची ठरेल, असे संशोधकांनी मत नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT