Viral Post: Girls Stay Safe! गोव्यातील बीचवर महिला पर्यटकांसोबत घडला धक्कादायक प्रकार, शेअर केला अनुभव Video

Goa Viral Video: आम्ही गोव्यात आल्यानंतर बागा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत होतो, त्यावेळी काही पुरुष आमचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागले.
Female tourist shares shocking experience on Goa beach
Goa viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसोबस काही ना काही विचित्र घटना घडत असतात. वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी योग्य कारवाई देखील केली आहे. काही विकृत पर्यटक 'गोवा में सबकुछ चलता है' या मानसिकतेत अयोग्य प्रकार करतात. अशीच एक घटना महिला पर्यटकांसोबत बागा समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा गोव्यात येणाऱ्या महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

प्रकरण नक्की काय

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन महिला बागा समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहेत. दरम्यान, त्याचवेळी शॅकवर बसलेले मध्यम वयाचा पुरुष या महिलांचे चोरुन चित्रिकरण करत असल्याचे उघडकीस आले आहे. महिलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत संबधित व्यक्तीला जाब विचारला.

Female tourist shares shocking experience on Goa beach
Pune Crime: पुण्यात गोवा बनावटीची बनावट दारु जप्त; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या तरुणाला अटक

महिला पर्यटकांनी काय म्हटले आहे?

आम्ही गोव्यात आल्यानंतर बागा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत होतो, त्यावेळी काही पुरुष आमचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागले. आमच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर याबाबत त्यांना जाब विचारला. या पुरुषाचा मोबाईल तपासला असता त्यात व्हिडिओ आढळून आला. या व्यक्तीने महिलांना झूम करुन पाहण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महिला पर्यटकांनी केला आहे.

मुलींनो सुरक्षित राहा!

पुरुष मंडळी आमचा व्हिडिओ करत असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यांना प्रश्न केला. तसेच, अशी घटना त्यांच्या घरातील महिलांसोबत घडला असता तर काय केले असता? असा प्रश्न आम्ही त्यांना केला. तसेच, व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करणार असल्याचे देखील सांगितले. दरम्यान, या महिला पर्यटकांनी मुलींनो सुरक्षित राहा असे आवाहन देखील केले आहे.

Female tourist shares shocking experience on Goa beach
Goa: 2050 साली गोव्‍यातील वीज वापर जाणार 5.2% वर! हरित ऊर्जा वापराची वाढती गरज

गोव्यात यापूर्वी देखील अशा घटना उघडकीस आल्या आहेत. पर्यटकांनी जाब विचारताच पोलिसांनी दखल घेत कारावाई केली होती. यानंतर आता बागा बीचवर घडलेल्या या घटनेने महिला पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, याप्रकरणी कारवाई होणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

शॅकवर बसून दारुचे सीप घेत केले कृत्य

पर्यटकांनी समुद्रकिनारी लावलेल्या शॅकवर बसून दारुचे सीप घेत हे कृत्य केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओत त्यांच्या शेजारी असलेल्या दारुच्या बाटल्याही दिसत आहेत. महिला पर्यटकांनी जाब विचारल्यानंतर पुरुष पर्यटक सॉरी - सॉरी म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com