Heart Attack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Health Tips: सिगारेट की अल्कोहोल? हृदयासाठी जास्त धोकादायक काय? जाणून घ्या काय सांगतायेत तज्ञ

Smoking Vs Alcohol Heart Damage: सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन हृदयरोगाच्या जोखमीवर कसे परिणाम करते यावर खूप कमी संशोधन झाले. पण जर एखादी व्यक्ती दिवसातून तीन किंवा त्याहून अधिक ड्रिंक्सचे सेवन आणि तेवढीच सिगारेट ओढत असाल तर ते हृदयासाठी हानिकारक ठरु शकते.

Manish Jadhav

देशात हृदयरोगांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, दरवर्षी भारतात सुमारे 25 लाख लोक विविध हृदयरोगांमुळे आपला जीव गमावतात. देशातील एकूण मृत्यूंपैकी 24.5 टक्के मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतात. वाईट खाण्याच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली हे हृदयरोग वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. तसेच, धूम्रपान आणि मद्यपान हे देखील हृदयासाठी हानिकारक मानले जाते. चला तर मग यापैकी हृदयासाठी सर्वात जास्त धोकादायक आहे ते तज्ञांकडून जाणून घेऊया...

सिगारेट आणि अल्कोहोलचे सेवन हृदयरोगाच्या (Heart Disease) जोखमीवर कसे परिणाम करते यावर खूप कमी संशोधन झाले. पण जर एखादी व्यक्ती दिवसातून तीन किंवा त्याहून अधिक ड्रिंक्सचे सेवन आणि तेवढीच सिगारेट ओढत असाल तर ते हृदयासाठी हानिकारक ठरु शकते. सिगारेट ओढल्याने हृदयरोगाचा धोका वाढू शकतो, तर मद्यपानाने उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. पण जर एखादी व्यक्ती सिगारेट ओढत नसेल आणि आठवड्यातून एकदा एक किंवा दोन पेग अल्कहोल पित असेल तर त्यामुळे हृदयाचे गंभीर नुकसान होत नाही. अल्कोहोलपेक्षा सिगारेट हृदयासाठी जास्त हानिकारक आहे. दिवसातून दोन सिगारेट ओढल्यानेही हृदयरोगाचा धोका वाढतो.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम कुमार यांच्या मते, जरी सिगारेटपेक्षा अल्कोहोल हृदयासाठी कमी धोकादायक असले तरी, याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने जास्त प्रमाणात मद्यपान करण्यास सुरुवात करावी किंवा जर तो सामान्यपणे मद्यपान करत नसेल तर त्याने मद्यपान करण्यास सुरुवात करावी. मद्यपानही शरीरासाठी हानिकारक आहे.

दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. अजित जैन सांगतात, किसेकेंड हॅण्ड स्मोकिंग म्हणजेच जेव्हा कोणीतरी धूम्रपान करत असेल तेव्हा तुमच्या शरीरात प्रवेश करणारा धूर तुमच्या हृदयासाठी तितकाच हानी पोहोचवतो.

ज्यांना आधीच हृदयरोग आहे त्यांनी काय करावे?

दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. तरुण कुमार सांगतात, ज्यांना आधीच हृदयरोग आहे त्यांच्यासाठी सिगारेट धोकादायक आहे. दिवसातून एक किंवा दोन सिगारेट ओढल्याने भविष्यात हृदयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. यामुळे पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बळावतो. डॉ. तरुण पुढे सांगतात, हृदयरोग्यांनीही मद्यपान टाळावे. जर त्यांना त्याचे सेवन करायचे असेल तर त्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT