Health Tips For Heart: हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'असा' ठेवा आहार

धमन्या सुरक्षित राहण्यासाठी असे काही उपाय आहेत जे नियमित केल्यास फायदेशीर ठरतात.
Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Health Tips For Heart to Avoid Heart Attack: हार्ट अटॅक हा जगातील सर्वात मोठा जीवघेणा आजार मानला जातो. Centers for Disease Control and Prevention च्या माहितीनुसार, चार जणांपैकी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण हे हार्ट अटॅक असतं.

मुळात हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये प्लॅमा होऊन आतील बाजूने धमनी अरूंद होते. परिणामी रक्त योग्यरित्या प्रवाहित होण्यास अडथळा येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.

धमन्या सुरक्षित राहण्यासाठी असे काही उपाय आहेत जे नियमित केल्यास फायदेशीर ठरतात.

हळद-

भारतीय मसाल्यामध्ये हळद ही आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी मानली जाते. हळदीचा आहारात समावेश केल्याने धमन्यांचं नुकसान होत नाही आणि रक्ताच्या गुठळ्याही होत नाहीत.

ग्रीन टी-

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅटेचिन असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. एका संशोधनानुसार असं लक्षात आलं होतं की, ज्य़ा व्यक्ती नियमितपणे ग्रीन टीचं सेवन करतात त्यांचं हृदयाची संपूर्ण आरोग्य प्रणाली निरोगी राहते. त्याचप्रमाणे ग्रीन टी पिणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा दोका 20 टक्क्यांनी कमी असतो

डाळिंब-

डाळिंबामध्यये phytochemicals चं प्रमाण असतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट असंत जे रक्तवाहिन्याच्या अस्तरांचं नुकसान होऊ देत नाही. डाळिंबाचा रस शरीरातील nitric oxide उत्तेजित करतं ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

ब्रोकोली-

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम असतं. ज्या धमन्यांचं नुकसान होण्यापासून संरक्षण होतं. त्याचप्रमाणे यामध्ये असलेल्या फायबरमुळे कोल्स्ट्रॉलची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

Health Tips
Mental Health: धावपळीच्या जगात 'असे' मिळवा मानसिक स्थैर्य

भाज्या आणि फळांना प्राधान्य द्या-

भाज्या आणि फळे हे शरीरासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले स्रोत आहेत. भाज्या आणि फळांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. भाजीपाला, फळे आणि वनस्पतीजन्य पदार्थ हृदयविकार टाळण्यास मदत करतात.

आहारात कडधान्यांचा समावेश करा-

संपूर्ण धान्यांमध्ये फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

जर तुम्ही तुमच्या आहारात प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी कड धान्याचा समावेश केला तर ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले राहील आणि भविष्यात हृदयविकाराच्या जोखमीपासूनही तुम्ही दूर राहाल

Health Tips
Neck Pain Remedies: मानदुखीपासून आराम मिळण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

फॅटयुक्त पदार्थाचे सेवन टाळा-

तुम्ही जितके कमी सॅच्युरेटेड फॅट वापरता  तुम्हाला कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. उच्च कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक तयार करते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com