Dry fruits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Benefits of Dry Fruits: 'हे' 5 पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ल्यास राहाल निरोगी

सुकामेवा रात्री भिजवुन खाल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

दैनिक गोमन्तक

Health Benefits of Dry Fruits: तुम्ही तुमच्या घरातील वडिलधार्‍यांना पाहिले असेल की ते सुकामेवा भिजवल्यानंतर खातात.

पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की कोणतीही पदार्थ हा भिजवल्यानंतर काय होते? खरंतर बदाम, मनुका, हरभरा अशा काही गोष्टी आहेत, ज्या भिजवून खाल्ल्याने त्यांच्यातील पोषकतत्व वाढतात.

यामुळे आरोग्याला खूप फायदे होतो. चला जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबद्दल जे भिजवून खाणे आरोग्यदायी असतात.

या गोष्टी भिजवून खाल्ल्याने होतो फायदा

  • मेथी दाणा

मेथीचे दाणे पाण्यात भिजवल्याने त्यामधील फायबर वाढते आणि त्याचे गुणधर्मही वाढतात. पाण्यात भिजवल्यानंतर मेथी दाणा खाल्याने पचनसंस्था चांगली असते. मेथीचे दाणे रात्री भिजवून सकाळी सेवन केल्याने मधुमेहाची समस्या कमी होते. यासोबतच केस आणि त्वचा देखील चमकते.

  • मनुका

मनुका पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. याचे फायबर देखील वाढते. ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता आणि मूळव्याध सारख्या समस्यां दुर होतात. हिमोग्लोबिन वाढते.

  • बदाम

बदाम रात्रभर भिजवून खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. बदामामध्ये कॅल्शियम, प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात आणि पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. यामुळे मेंदूचे विकार दूर होण्यास मदत होते. स्मरणशक्ती देखील चांगली राहते.

  • अंजीर

अंजीरमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यात पॉलिफेनॉल आणि खनिजे असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करण्यात मदत करतात. दुसरीकडे, जर तुम्हाला पचनाच्या समस्येने त्रास होत असेल तर अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

  • जवस

जवसाच्या बिया भिजवून खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. भिजवल्यानंतर जवसाचा आकार मोठा होतो. जे खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. अशा प्रकारे तुम्ही वजन कमी करू शकता. यामुळे मधुमेह नियंत्रणातही मदत होते. 

  • काळा हरभरा

भिजवलेले काळे हरभरे खाल्ल्याने तुम्हाला भरपूर प्रथिने आणि फायबर मिळतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरात ऊर्जा येते आणि त्यामुळे तुमचा थकवा दूर होण्यासही मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT